फडणवीस CMअसताना अंडरवर्ल्ड डॉन त्यांना वर्षावर भेटला, थोरातांचा खळबळजनक आरोप

फडणवीस CMअसताना अंडरवर्ल्ड डॉन त्यांना वर्षावर भेटला, थोरातांचा खळबळजनक आरोप

'दुसरा एक गुन्हेगार मुन्ना यादव याला तर फडणवीसांनी एका सरकारी कमेटीवरही घेतलं होतं.'

  • Share this:

मुंबई 17 जानेवारी : माजी पंतप्रधान इंदिरा गांधीं या अंडरवर्ल्ड डॉन करीम लाला याला भेटायच्या या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यावरून वादळ निर्माण झालाय. राऊत यांनी आपलं वक्तव्य मागे घेतलं असलं तरी वाद शांत होण्याची चिन्हे नाहीत. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर खळबळजनक आरोप केलाय. फारसा प्रसिद्ध नसलेले अंडरवर्ल्ड डॉन हा फडणवीसांना ते मुख्यमंत्री असताना वर्षावर येत होता असा आरोप त्यांनी केलाय. एवढच नाही तर मुन्ना यादव या अट्टल गुन्हेगाराला त्यांनी वाचवलं आणि सरकारी पदही दिलं असा आरोप केलाय.

थोरात यांनी ट्वीट करत आरोप केला की, एक फारसा प्रसिद्ध नसलेला डॉन वर्षावर फडणवीसांना भेटायला जात होता. तर दुसरा एक गुन्हेगार मुन्ना यादव याला तर त्यांनी एका सरकारी कमेटीवरही घेतलं होतं असा गंभीर आरोप केलाय.

थोरातांच्या या आरोपांना फडणवीसांनी उत्तर दिलंय. मी कधीही गुन्हेगारांना संरक्षण दिलेलं नाही. मुन्ना यादव हे नागपुरातून तीन टर्म नगरसेवक म्हणून निवडून गेले होते. संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळे जो वाद निर्माण झाला त्यापासून लक्ष वळविण्याचा प्रयत्न करू नका असं मतही त्यांनी व्यक्त केलंय.

उद्या सांगली बंद

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शुक्रवारी इस्लामपूरला एका कार्यक्रमासाठी येत आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच सांगली जिल्ह्यात येत असताना शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष भिडे गुरूजी यांनी सांगली बंदचं आवाहन केलंय. शिवसेनेचे खासदार उदयनराजे भोसले यांच्याविषयी खासदार संजय राऊत यांनी जे वक्तव्य केलं होतं त्याविरोधात हे आंदोलन करण्यात येणार आहे. भिडे गुरुजी म्हणाले, छत्रपतींच्या घराण्याचा अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही. हे वक्तव्य करणाऱ्या संजय राऊत यांची हकालपट्टी करावी अशी मागणीही त्यांनी केली.

या विरोधात सर्व सांगली जिल्हा उद्या म्हणजे 17 जानेवारीला बंद राहणार आहे. संजय राऊतांनी माफी न मागितल्यास सर्व महाराष्ट्रात आंदोलन छेडण्यात येईल असंही ते म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी तातडीन त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 16, 2020 06:03 PM IST

ताज्या बातम्या