मुंबई, 28 सप्टेंबर : बिबट्यांनी (Leopard attack) लहान मुलांवर (Leopard attack on children) हल्ले केल्याची बरीच प्रकरणं आपल्याला माहिती आहेत. बऱ्याचवेळा आईने आपल्या चिमुकल्यांसाठी बिबट्याशी लढा दिल्याचं आपण पाहिलं आहे (Leopard attack in aarey colony). पण आता एक काका आपल्या पुतण्यासाठी बिबट्याशी भिडला आहे (Uncle saved nephew from leopard). बिबट्याच्या जबड्यातून काकाने आपल्या पुतण्याला सुखरूप परत आणलं आहे.
26 सप्टेंबरला रात्री गोरेगावच्या आरे कॉलनीतल्या (Aarey Colony) एका वस्तीत चार वर्षांच्या मुलावर एका बिबट्याने (Leopard) हल्ला (Attack) केल्याची घटना घडली. त्याच्या काकांनी (Uncle) हिंमत दाखवून आरडाओरडा करून बिबट्याचा पाठलाग केल्याने, बिबट्याने मुलाला सोडलं आणि त्या चिमुरड्याचा जीव वाचला.
मिड-डेनं दिलेल्या वृत्तानुसार, युनिट-3 मधल्या एका घरात राहत असलेल्या यादव कुटुंबातला आयुष हा अवघा चार वर्षांचा मुलगा त्या रात्री साधारण 8 वाजण्याच्या सुमारास घराबाहेर खेळत होता. अचानक बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला आणि आयुषचं डोकं जबड्यात पकडून तो झुडपाच्या दिशेनं पळू लागला. घराच्या दारातच उभे असलेले आयुषचे काका विनोद कुमार यादव यांनी हे बघितलं आणि ते आरडाओरडा करत त्या बिबट्याच्या मागे धावू लागले. जवळपास तीस फूट अंतरापर्यंत त्यांनी बिबट्याचा पाठलाग केला आणि बिबट्या ज्या झाडीत शिरला तिथे त्यांनी उडी मारली. त्यामुळे घाबरलेल्या बिबट्याने आयुषला सोडलं आणि तो पळून गेला. बिबट्याच्या या हल्ल्यात आयुषच्या डोक्याला आणि मानेला दुखापत झाली असून, आठ टाके पडले आहेत.
हे वाचा - माकडानं घेतला अपमानाचा बदला; रिक्षाचालकाला धडा शिकवण्यासाठी केला 22 km प्रवास
‘माझा दीर बिबट्याच्या मागे धावला नसता तर आयुषचं काय झालं असतं, याची कल्पनाही करू शकत नाही. आयुष वाचला ही देवाचीच कृपा; पण बिबट्यापासून आमचं रक्षण व्हावं यासाठी प्रशासनानं किमान इथला कचरा साफ करावा आणि पथदिवे (Street Light) तरी बसवावेत,’ अशी अपेक्षा आयुषची आई आरती यादव यांनी व्यक्त केली.
ऑगस्ट महिन्यापासून बिबट्याचा हा चौथा हल्ला (Fourth Attack) असून, ऑगस्ट महिन्यात तीन वेळा बिबट्यानं हल्ले केले आहेत. त्यात एक महिला, एक पुरुष आणि दहा वर्षांचा एक मुलगा जखमी झाला होता. त्यानंतर बिबट्याने केलेला हा चौथा हल्ला आहे. आता स्थानिक अधिकारी (Local Autorities) आणि लोकप्रतिनिधींनी (Public Representatives) तातडीनं यात लक्ष घालून योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी इथले नागरिक करत आहेत. निर्जन अंधारे रस्ते, कचरा आणि दाट झाडी यामुळे वन्यप्राणी सहज हल्ला करू शकतात. त्यामुळे इथं पथदिवे लावावेत, साफसफाई करावी अशी त्यांची मागणी आहे.
हे वाचा - मम्मी रॉक मुलगा शॉक! साध्याभोळ्या आईचं टॅलेंट पाहून लेकाची हवा टाईट; VIDEO VIRAL
दरम्यान, या घटनेनंतर आमदार रवींद्र वायकर, स्थानिक शिवसेना नेते संदीप गाढवे, सहायक वनसंरक्षक गिरिजा देसाई आणि प्रभाग अधिकाऱ्यांनी पथदिवे लावणं, कचरा साफ करणं आणि पाणीपुरवठा यावर चर्चा केली. याबाबत तत्काळ कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, वन विभागालाही (Forest Department) आवश्यक उपाययोजना करण्याची विनंती केली असल्याचं वायकर यांनी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.