...म्हणून महिलेनं मंत्रालयात केला आत्महत्येचा प्रयत्न, धक्कादायक माहिती समोर!

...म्हणून महिलेनं मंत्रालयात केला आत्महत्येचा प्रयत्न, धक्कादायक माहिती समोर!

उल्हासनगर इथं राहणाऱ्या प्रियांका गुप्ता या महिलेचं आज दुपारी मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न केला.

  • Share this:

मुंबई, 13 डिसेंबर : राज्याचा कारभाराचा गाडा जिथून हाकला जातो त्या मंत्रालयात आज पुन्हा एकदा आत्महत्येचा प्रयत्न केला गेला. उल्हासनगर येथील एका महिलेनं सहाव्या मजल्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने सुरक्षा जाळी लावल्यामुळे या तरुणीचा जीव वाचला. परंतु, पोलिसांनी चौकशी केली असता धक्कादायक माहितीसमोर आली आहे.

उल्हासनगर इथं राहणाऱ्या प्रियांका गुप्ता या महिलेचं आज दुपारी मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न केला. सहाव्या मजल्यावरून या महिलेनं उडी मारली.  या महिलेचा  नवरा गेल्या काही वर्षांपासून आजारी आहे. त्यांच्या उपचारांचा खर्च हाता बाहेर गेल्यामुळे तीने मुख्यमंत्री सहाय्यता निधी मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला होता. मात्र, त्यात सतत दिरंगाई होत असल्यामुळे तिने आज मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, असं सांगितलं जात आहे.

मात्र, मंत्रालयाच्या दुसऱ्या मजल्यावर सुरक्षा जाळी बसवण्यात आल्यामुळे तिचा जीव वाचला. ती या सुरक्षा जाळीमध्ये अडकल्यावर तिला मंत्रालयातील पोलिसांनी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी सुरक्षित बाहेर काढलं. प्रियांका गुप्ताला मोठा मानसिक धक्का बसला. मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यातील पोलिसांनी या महिलेला सेंट जॉर्ज रुग्णालयात  नेण्यात आले आहे.

पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियंका गुप्ता ही उल्हासनगर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात पोलिसांना मारहाण प्रकरण आणि मध्यरात्री उशिरापर्यंत ज्यूस सेंटर सुरू ठेवत असल्यानं पोलिसांनी कारवाई केली होती.

दरम्यान, याआधी देखील अनेकदा मंत्रालयात असं आत्महत्येचे प्रयत्न केलेल्या घटना घडल्या. मात्र, सरंक्षण जाळीमुळे त्यांचे देखील प्राण वाचले होते.आज घडलेल्या या घटनेबाबत अधिक माहिती मारिन ड्राईव्ह पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मृत्युंजय हिरेमठ आणि पोलीस उपायुक्त दत्तात्रय कांबळे यांना विचारले असता, नेमकं या महिलेने आत्महत्येचा प्रयत्न का केला याची चौकशी सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

नव्या सरकारमध्ये पहिल्यांदाच आत्महत्येचा प्रयत्न

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र येऊन महाविकासआघाडी स्थापन केली. नव्या सरकारच्या कारभाराला सुरुवात झाल्यानंतर काही दिवस लोटले नाही तेच आत्महत्येचा प्रयत्न करण्याची घटना घडली. याआधीही फडणवीस आणि आघाडी सरकारच्या काळात मंत्रालयात आत्महत्या करण्याच्या घटना घडल्या होत्या. फेब्रुवारी 2018 मध्ये धुळ्यातील 80 वर्षांचे शेतकरी धर्मा पाटील यांनी विष प्राशन करून मंत्रालयात आत्महत्या केली होती. या प्रकरणाचे राज्यभरात पडसाद उमटले होते. या प्रकरणानंतर मंत्रालयात आत्महत्याच्या घटना रोखण्यासाठी सुरक्षा जाळी लावण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु, तरीही आत्महत्येचा प्रयत्न करण्याच्या घटना कमी झाल्या नाही.

Published by: sachin Salve
First published: December 13, 2019, 6:06 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading