उल्हासनगर, 07 जून : कल्याण तालुक्यातील (Kalyan) द्वारली गावातील 85 वर्षीय तथाकथित बुवा त्याच्या 80 वर्षीय पत्नीला मारहाण (85 Old man beaten 80 year old wife) करत असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) झाला होता. या प्रकरणी संबंधित वृद्धाच्या विरोधात गुन्हा दाखल (Case Registered) करण्यात आला आहे. उल्हासनगर हिल लाईन पोलीस ठाण्यात (Ulhasnagar Hill Line Police station) गजानन चिकणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. सोशल मीडियावर गजानन चिकनकरची पत्नीला मारहाण करण्याची क्लिप व्हायरल झाली होती. त्यानंतर प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला आहे.
(वाचा-अभिनेता मोहीत रैनाची चौघांच्या विरोधात पोलिसांत तक्रार, पसरवत होते चुकीची माहिती)
कल्याणच्या द्वारली या गावामध्ये राहणारे गजानन चिकणकर हे स्वतः बुवा असल्याचं सांगतात. मात्र भक्तांना उपदेश देणाऱ्या या महाराजांनी स्वतःच्या पत्नीलाच बेदम मारहाण केली होती. 80 वर्षाच्या वृद्ध पत्नीला काम करत नसल्याच्या कारणाववरून त्यांनी मारहाण केली होती. विशेष म्हणजे या बुवांना दोन बायका आहेत. त्यापैकी पहिल्या पत्नीला मारहाण करतानाचा हा व्हिडिओ आहे. आजुबाजुला असलेल्या इतर महिला आणि कुटुंबातील व्यक्तींनीही त्यांना अडवलं नाही.
(वाचा-मुख्यमंत्री ठाकरे आणि अजितदादा मोदींच्या भेटीला, मराठा आरक्षणावर तोडगा निघणार?)
व्हिडिओमध्ये दिसणारं दृश्य अत्यंत गंभीर आहे. हा व्यक्ती पत्नीला वारंवार मारहाण करत पुन्हा असं करशील का अशी विचारणा करताना दिसत आहे. लाथांनी आणि अगदी हातातील बादलीनं त्यानं पत्नीला मारहाण केली. यानंतरही या वृद्धानं पत्नीला ओढत नेत भिंतीवर आदळलं. घरातून बाहेर काढण्यासाठी तो तिला ओढून नेत असल्याचंही पाहायला मिळालं. त्यात या व्यक्तीच्या वृद्ध पत्नीच्या हाताला दुखापतही झाली. या सर्व प्रकाराचा व्हिडिओ या वृद्धाच्या नातवानंच तयार केला आहे.
या व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ वाहून नेटकऱ्यांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. त्यानंतर आता उल्हासनगर पोलिसांत तक्रार दाखल झाल्यानंतर या अमानुष प्रकारासाठी वृद्धावर काय कारवाई होणार हे पाहावं लागणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Kalyan, Ulhasnagar