UGC च्या निर्णयाविरोधात लढाई, आदित्य ठाकरेंनी मानले काँग्रेससह राष्ट्रवादीचे आभार

UGC च्या निर्णयाविरोधात लढाई, आदित्य ठाकरेंनी मानले काँग्रेससह राष्ट्रवादीचे आभार

विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) अंतिम वर्षाच्या परीक्षा सप्टेंबर अखेरपर्यंत घेण्याचा आदेश काढला आहे

  • Share this:

मुंबई, 19 जुलै : पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा अंतिम वर्ष विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा मुद्दा काढत यूजीसीने परीक्षा आग्रह धरू नये, तसंच लाखो विद्यार्थ्यांच्या जीवासोबत खेळू नका, असं आवाहान केलं आहे. यावेळी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचेही आभार मानले

'युवासेनेने सुप्रीम कोर्टात केलेल्या याचिकेला राष्ट्रीय युवक काँग्रेस आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसने दिलेल्या समर्थनासाठी मी त्यांचे आभार मानतो. हा लढा प्रत्येक विद्यार्थ्याचा आहे, शिक्षकांचा आहे. आम्ही तिन्ही युवा आवाज, यूजीसीला एवढेच सांगत आहोत की लाखो जीवांशी खेळू नका,' असं ट्वीट आदित्य ठाकरे यांनी केलं आहे.

दरम्यान, 'देशातील विद्यार्थ्यांच्या हितासाठी शिवसेना नेते व मंत्री, युवासेना प्रमुख आदित्य साहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेनेने यूजीसीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे,' अशी माहिती युवासेनेचे सचिव वरुन सरदेसाई यांनी सांगितलं आहे.

अंतिम वर्षाची परीक्षा: यूजीसी Vs ठाकरे सरकार

विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) अंतिम वर्षाच्या परीक्षा सप्टेंबर अखेरपर्यंत घेण्याचा आदेश काढला आहे. आधीच राज्य सरकारने अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय जाहीर केला होता. तसंच, कोरोनाच्या परिस्थितीत अंतिम वर्षाच्या परीक्षा घेता येणार नाही, असं सरकारकडून स्पष्ट करण्यात आहे.

मागील आठवड्यातच, युजीसीने दिलेल्या निर्णयानुसार महाराष्ट्रात सप्टेंबरपर्यंत परीक्षा घेणं अशक्य असल्याचं राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा जाहीर केलं होतं.

'अंतिम वर्षांच्या परीक्षांसदर्भात आम्ही महाराष्ट्रातील सर्व कुलगुरू आणि विविध शैक्षणिक संस्थांचे संचालकांसोबत चर्चा केली. मात्र, 30 सप्टेंबरपर्यंत विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेत येणार नाही, अशा प्रतिक्रिया सर्व कुलगुरू आणि शिक्षण संचालकांनी दिली आहे. त्यामुळे अंतिम वर्षाची परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. तसंच यूजीसीसोबत पत्रव्यवहार करुनच राज्य सरकारने अंतिम परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता,' असंही सामंत यांनी त्यावेळी सांगितलं.

Published by: Akshay Shitole
First published: July 19, 2020, 2:40 PM IST

ताज्या बातम्या