S M L

अहमदाबादेत पतंग उडवण्यापेक्षा श्रीनगरला तिरंगा फडकवा - उद्धव ठाकरे

छाती किती इंचाची आहे हा प्रश्न नाही पण त्यात किती शौर्य आहे हे महत्त्वाचं आहे असा टोला मारत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर सडकून टीका केली आहे.

Sonali Deshpande | Updated On: Jan 23, 2018 02:04 PM IST

अहमदाबादेत पतंग उडवण्यापेक्षा श्रीनगरला तिरंगा फडकवा - उद्धव ठाकरे

मुंबई, 23 जानेवारी : छाती किती इंचाची आहे हा प्रश्न नाही पण त्यात किती शौर्य आहे हे महत्त्वाचं आहे असा टोला मारत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर सडकून टीका केली आहे. ते म्हणाले, ' गाईला मारणे पाप आहे त्याप्रमाणे थाप मारणेही पाप आहे. थापाबंदी करा. लोकांना भुलवून सत्ता मिळवणं पाप आहे.'

शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत बोलताना उद्धव ठाकरेंनी अनेक मुद्यांवर भाष्य करत टीकेची तोफ डागली. यावेळी बोलताना त्यांनी नितीन गडकरींच्या नौदलाविरोधात वक्तव्यावर आक्षेप घेत नितीन गडकरींचं बोलणं ऐकून पायाची आग मस्तकात गेली असल्याचं म्हटलं. इतकंच असेल तर सैनिकांचं फुकटचं श्रेय तुम्ही लाटू नका. दुर्दैवाने तुमचं सरकार आहे. सरकार म्हणून मस्ती दाखवता. राज्यकर्त्यांच्या डोक्यात मस्तवालपणा घुसला आहे अशा शब्दांत त्यांनी सुनावलं.

आपल्या भाषणात त्यांनी चंद्रकांत पाटलांवरही घणाघाती टीका केली. त्यांच्या बेळगाव वक्तव्याचा सडकून समाचार घेतला. अमित शहांमुळे चंद्रकांत पाटलांना लॉटरी लागली, असंही ते म्हणाले.

भीमा कोरेगाव घटनेबद्दल बोलताना ते म्हणाले, कोरेगाव भीमा घटनेमागे अदृश्य हात आहेत. हे हात कोणाचे आहेत सर्वांना माहीत आहे. जेव्हा कधी हे हात सापडतील तेव्हा त्यांची होळी करू.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

Loading...
Loading...

- आगीत उड्या टाकतील असे सोबती मला दिले

- मला आज शिवसेना प्रमुखांसोबत माँची पण आठवण येते

- घराणेशाही आणी परंपरा यात फरक आहे

- आदित्य ही आमच्या घराची सहावी पिढी

- विश्वासाला आम्ही कधीच तडा जाऊ देणार नाही

- आज जर सदरदार वल्लभभाई असते तर अनेक प्रश्न कधीच सुटले असते

- गुजरात निवडणुकीत पाकिस्तानाच्या उल्लेखाची काय गरज

-एकदा घुसा आणि पाडा फडशा त्या पाकिस्तानाचा

- नेव्हीबाबत जे नितीन गडकरी बोलले ते खूप भयंकर

-असं असेल तर सर्जिकल स्राईकच क्रेडिट नाका घेऊ

- व्हीएमसी घोटाळे करून सरकारवर येता असं जनता म्हणते

- हम सरकार है तुमचं हे काम आहे, हे बोलून ते सैनिकांची अवहेलना करतात

- मोदी परदेशातले नेते आले त्यांना अहमदाबादला नेतात

- लाल चौकात तिरंगा फडकवायचा तर अहमदाबादमध्ये पतंग उडवतात

- अहमदाबादमध्ये पतंग उडवले तसे श्रीनगरला जाऊन तिरंगा फडकवला असता तर मोदी यांचा अभिमान वाटला असता

पहा उद्धव ठाकरेंचं पूर्ण भाषण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 23, 2018 02:04 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close