मुंबई, 5 जुलै : सरपंच आणि नगराध्यक्ष जनतेतून निवडत असाल तर मग मुख्यमंत्रीही थेट जनतेमधूनच निवडा, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावलाय. राज्य सरकारने यापुढे सरपंच थेट जनतेमधून निवडला जाणार असल्याचा निर्णय घेतलाय. त्यावर उद्धव ठाकरेंना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच टार्गेट केलंय. ते मुंबईत बोलत होते. शिवसेना सरकारला अनेक मुद्यांवर पाठिंबा देतेय. पण सरकार काही निर्णय अभ्यास न करता घेत असेल तर शिवसेना यापुढेही विरोध करणारच असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलंय.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा