S M L

महागाईनंतर आता अंगणवाडी सेविकांसाठी उद्धव ठाकरे मैदानात

'मी नेतृत्व करायला नाही आलोय, तर तुमच्या नेतृत्वाला ताकद देण्यासाठी आलोय,' शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अंगणवाडी सेविकांसमोर बोलताना म्हणाले.

Sonali Deshpande | Updated On: Sep 27, 2017 04:09 PM IST

महागाईनंतर आता अंगणवाडी सेविकांसाठी उद्धव ठाकरे मैदानात

मुंबई, 27 सप्टेंबर : 'मी नेतृत्व करायला नाही आलोय, तर तुमच्या नेतृत्वाला ताकद देण्यासाठी आलोय,' शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अंगणवाडी सेविकांसमोर बोलताना म्हणाले. महाराष्ट्रातील दोन लाखाहून अधिक अंगणवाडी सेविकांच्या आज विविध मागण्यांसाठी राज्यभर महामोर्चा निघाला आहे. त्यात अंगणवाडी सेविकांचा प्रमुख मोर्चा मुंबईतल्या आझाद मैदानात सुरू आहे. जिथे उद्धव ठाकरेंनी भाषण केलं.

आपल्या भाषणात त्यांनी सरकारवर टीका केली. ते म्हणाले, 'मुर्दाडपणाने आम्ही कारभार करत नाही. लाखो कुपोषित बालकांचा हा आक्रोश आहे. ते असंही म्हणाले की, लोक आता पिसाळलेत. आम्हाला विकास तर पाहिजेच. पण त्या आधी चुलीवर अन्न  शिजलं पाहिजे.

उद्धव ठाकरेंनी  मुख्यमंत्र्यांवरही निशाणा साधला. ते म्हणाले,  'निवडणूक आल्यावर तुम्हाला शिवरायांची आठवण होते. ते शिवराय मातृभक्त होते. तुम्हाला या सर्व मातांचे शाप लागल्याशिवाय राहाणार नाही. अंगणवाडी सेविकांचा संप चिरडण्याचं ठरवलं जातंय.ही लोकशाहीच्या मार्गाने ठोकशाही चालणार असेल तर आम्ही ते चालू देणार नाही.'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 27, 2017 03:58 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close