S M L

अमित शहा-उद्धव ठाकरे बैठकीत राष्ट्रपतीपदावर झाली चर्चा

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या बैठकीत राष्ट्रपती पदासाठी एनडीएचे उमेदवार म्हणून संघाचे सरसंघचालक प्रमुख मोहन भागवत यांच्या नावाचा आग्रह उद्धव ठाकरेंनी केलाय.

Sonali Deshpande | Updated On: Jun 18, 2017 12:04 PM IST

अमित शहा-उद्धव ठाकरे बैठकीत राष्ट्रपतीपदावर झाली चर्चा

18 जून : अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांची बैठक संपली. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या बैठकीत राष्ट्रपती पदासाठी एनडीएचे उमेदवार म्हणून संघाचे सरसंघचालक  प्रमुख मोहन भागवत यांच्या नावाचा आग्रह उद्धव ठाकरेंनी केलाय. मोहन भागवतांच्या नावाला तुमचा आक्षेप असेल तर स्वामीनाथन यांच्या नावासाठी आम्ही आग्रही आहोत, असं शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

ही बैठक शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात मातोश्रीमधील वरच्या मजल्यावर झाली.

मात्र भाजपप्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना बैठकीतून वगळलं. रावसाहेब दानवेंना बैठकीच्या बाहेरच बसवलं. त्यांना बैठकीत घेतलं नाही. शेतकऱ्यांसदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे दानवेंना या बैठकीतून वगळल्याची माहिती आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 18, 2017 11:55 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close