कोणत्याही बड्या नेत्याला न जुमानता कमला मिलमध्ये अनधिकृत बांधकामावर कारवाई करा-उद्धव ठाकरे

कोणत्याही बड्या नेत्याला न जुमानता कमला मिलमध्ये अनधिकृत बांधकामावर कारवाई करा-उद्धव ठाकरे

कमला मिल आगीप्रकरणी कोणत्याही बड्या नेत्याचा न जुमानता, दबाव न बाळगता अनधिकृत बांधकामावर कारवाई करा, असे आदेश महापालिका आयुक्तांना दिलेत. तसंच या कारवाईला शिवसेनेचा पाठिंबा असल्याचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले.

  • Share this:

मुंबई, 06 जानेवारी : कमला मिल आगीप्रकरणी कोणत्याही बड्या नेत्याचा न जुमानता, दबाव न बाळगता अनधिकृत बांधकामावर कारवाई करा, असे आदेश महापालिका आयुक्तांना दिलेत. तसंच या कारवाईला शिवसेनेचा पाठिंबा असल्याचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले. डाॅक्टर विजय ढवळे यांच्या पुस्तकाचं प्रकाशन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झालं. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

तर  या प्रकरणातील पब चालकांना पकडण्यासाठी बक्षीस जाहीर करावं लागतंय हा कहर असून पोलीस आणि गृहखात्यावर उद्धव ठाकरेंनी ताशेरे ओढले. एवढी यंत्रणा कुचकामी ठरतेय का ? इनाम लावायला ते दहशतवादी आहेत का ? पोलीस खातं, गृह खातं काय करतंय मग ?

आणखी काय म्हणाले उद्धव ठाकरे?

कमला मिल दुर्घटनेआधी आदित्य कमला मिल इथे गेले होते असं सांगताय, मग मंत्रालयाला आग लागली होती त्यांच्या आधी मुख्यमंत्रीही तिथे होते.

भीमा कोरेगाव आणि महाराष्ट्रतील इतर विषयांवर नंतर बोलणार.

रुफ टॉपला विरोध करणाऱ्यांच्या रुफला टॉप आहे का ?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 6, 2018 01:10 PM IST

ताज्या बातम्या