आज तिथीनुसार शिवजयंती, उद्धव ठाकरेंनी अर्पण केला महाराजांना पुष्पाहार

आज तिथीनुसार शिवजयंती, उद्धव ठाकरेंनी अर्पण केला महाराजांना पुष्पाहार

आज राज्यभरात तिथीनुसीर शिवजयंती साजरी करण्यात येत आहे. शिवसेनेतर्फे अंधेरीतील विमानतळ परिसरात असलेल्या शिवाजी पुतळ्याजवळ शिवसेना शिवजयंती साजरी करण्यात आली.

  • Share this:

मुंबई, 04 मार्च : आज राज्यभरात तिथीनुसीर शिवजयंती साजरी करण्यात येत आहे. शिवसेनेतर्फे अंधेरीतील विमानतळ परिसरात असलेल्या शिवाजी पुतळ्याजवळ शिवसेना शिवजयंती साजरी करण्यात आली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या ठिकाणी उपस्थित होते.

यावेळी उद्धव ठाकरे आणि शिवसेनानेते अनिल परब यांनी क्रेनमधे चढून शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांला पुष्पहार अर्पण केला. कार्यकर्त्यांना संबोधित करताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विमानतळ प्रशासन आणि जीविकेकडे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडे दुर्लक्ष होत आहे, याबाबत नाराजी व्यक्त केली.

ते म्हणाले, ' विमानतळ व्यवस्थापन सरकार आणि जीविकेला विनंती करतो की हा पुतळा तुम्ही फक्त उभा करुन ठेवलाय. हे यापुढे चालणार नाही. या ठिकाणी भव्य देखावा उभा करा आणि छत्रपतींवर छत्र सुद्धा टाका.

तुमची कुवत नसेल तर शिवसेना याठिकाणी कायमस्वरूपी रायगड उभा करेल.'

First published: March 4, 2018, 12:39 PM IST

ताज्या बातम्या