S M L

मुंबईच्या फेरीवाल्यांचा प्रश्न सेनेच्या पाठपुराव्यामुळे सुटला-उद्धव ठाकरे

जनतेच्या पायरीवर जाऊन त्यांच्या समस्या जाणून घ्या असं विधान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.ते सेना भवन मुंबई येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

Chittatosh Khandekar | Updated On: Oct 7, 2017 04:02 PM IST

मुंबईच्या फेरीवाल्यांचा प्रश्न सेनेच्या पाठपुराव्यामुळे सुटला-उद्धव ठाकरे

मुंबई ,07 ऑक्टोबर : मुंबईत फेरीवाल्यांचा प्रश्न हा सेनेच्या पाठपुराव्यामुळेच सुटला असा दावा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलाय. तसंच  जनतेच्या मनात काय आहे ते जाणून घ्या. जनतेच्या पायरीवर जाऊन त्यांच्या समस्या जाणून घ्या असा सल्लावजा टोला उद्धव ठाकरेंनी सेनेला लगावला. सेना भवन मुंबई येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

जनतेच्या हिताची काम केली तर आम्ही नेहमीच साथ देऊ असंही यावेळी उद्धव ठाकरेंनी सांगितलं. तसंच तत्वत: भारनियमन बंदी केली म्हणजे नक्की काय केलं? असा सवाल  त्यांनी विचारला आहे. कोळश्याच्या तुटीवरही त्यांनी प्रश्नचिन्ह  उपस्थित केलं. तर मुंबईच्या फेरीवाल्यांचा आणि अंगणवाडी सेविकांचा प्रश्न सेनेच्या पाठपुराव्यामुळे सुटला असल्याचं त्यांनी सांगत प्रश्न सोडवल्याबद्दल राज्य सरकारचे आभार मानले.

यावेळी त्यांनी वाढत्या महागाईच्या मुदद्यावरून सरकारवर कडाडून टीका केली आहे. दिवाळीच्या तोंडावर देशावर महागाईच संकट आल्याचं त्यांनी सांगितलं .पेट्रोल डिझेलपासून सगळ्याच गोष्टींचे भाव वाढत असल्याने सामान्यांच जगणं कठीण होतं आहे तेव्हा सर्वसामान्यांना दिलासा देणारे निर्णय सरकारने घ्यावे असा सल्लाही त्यांनी सरकारला दिला आहे.नाहीतर जनतेचा उद्रेक  होईल असा इशाराही  त्यांनी दिला.तसंच जीएसटी संदर्भात व्यापाऱ्यांचा विजय झाल्याचं ही त्यांनी सांगितलंय. लक्ष्मीपूजना आधी लोकांकडून केंद्र सरकारने लक्ष्मीचं ओरबाडून घेतली मग लक्ष्मीपूजन कसं करणार? अशी टीकाही त्यांनी केंद्र सरकारवर केली आहे.

सरकारवर खूप टीका करायचे सोडून आज सल्ला द्यायचा पवित्रा उद्धव ठाकरेंनी घेतला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 7, 2017 02:29 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close