सरदार पटेलांच्या पुतळ्यासमोर उभं राहून एकदा स्वत:ची उंची तपासा - उद्धव ठाकरे

सरदार पटेलांच्या पुतळ्यासमोर उभं राहून एकदा स्वत:ची उंची तपासा - उद्धव ठाकरे

यावेळी उद्धव ठाकरेंनी राम मंदिर, राफेल करार आणि सरदार पटेलांच्या स्मारकावरून मोदी सरकारवर घणाघात केला आहे.

  • Share this:

उदय जाधव, प्रतिनिधी

रायगड, 01 ऑक्टोबर : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सध्या रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी राम मंदिर, राफेल करार आणि सरदार पटेलांच्या स्मारकावरून मोदी सरकारवर घणाघात केला आहे. सरदार वल्लभभाईंचा पुतळा उभारलात मात्र त्यांच्या उंचीसमोर तुमची उंची तपासून पहा, असा टोलाच त्यांनी पंतप्रधान मोदींना लगावला आहे.

तसंच राफेल विमानं तिप्पट किमतीनं खरेदी करणे हा घोटाळा नाही का?  अशा शब्दात मोदी सरकारवर त्यांनी ताशेरे ओढलेयत. तर राम मंदिरासाठी कायदा करा, माझा त्याला जाहीर पाठिंबा असेल असं वक्तव्य देखील यावेळी उद्धव ठाकरेंनी केलं आहे.

गडकरींना खात्रीच नव्हती सरकार येईल का, पण मला खात्री आहे. येत्या निवडणुकीत आपलंच सरकार येणार आहे, असा आत्मविश्वास शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी कर्जतमध्ये आयोजित रायगड लोकसभा मतदार संघाच्या सभेत व्यक्त केला आहे.

काल वल्लभभाईंचा पुतळा उभारला. पुतळा जेवढा मोठा आहे.  त्यासमोर तुमची उंची पहा किती आहे ते. वल्लभभाईंचे कोणते गुण तुमच्यात आहेत असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी मोदींवर टीका केली आहे.

VIDEO : "...ते 'सामना'च्या आगीने जळून खाक होईल," शिवसेनेचा मुख्यमंत्र्यांना इशारा

वल्लभभाई जर पंतप्रधान असते तर आज पूर्ण काश्मीर आपल्याकडेच असतं. तुम्ही पंतप्रधान आहात मग काय करताय काश्मीरसाठी, असा सवालही यावेळी त्यांनी मोदींना विचारला.

'राफेल फायटर  विमानासाठी जी किंमत ठरली होती तिच्या तिप्पट किंमत देऊन खरेदी केली जातायेत. विमान खरेदी करायचं म्हणजे पापड लाटण्याचं काम आहे का...?' 'राफेलमध्ये पैसे खाल्ले नाही तर मग सर्व समोर येऊ द्या' असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं.

उज्ज्वला योजनेमध्ये ५ कोटी कुटुंबीयांना लाभ मिळाला पण अनुदानच गायब. अनुदानित सिलेंडर तुमच्याच घरी घेऊन जा आणि गॅस भरा. एकासुद्धा शेतकऱ्याला कर्जमाफीचा लाभ नाही. मग ३२ हजार कोटी कुठे गेले? असे ताशेरे ओढत त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

 

First published: November 1, 2018, 5:22 PM IST

ताज्या बातम्या