मुख्यमंत्री फितूर झाले, 'नाणार' होऊ देणार नाहीच ! -उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री फितूर झाले, 'नाणार' होऊ देणार नाहीच ! -उद्धव ठाकरे

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना दिल्लीत किंमत नाही अशी घणाघाती टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलीये.

  • Share this:

मुंबई, 12 एप्रिल : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना दिल्लीत किंमत नाही अशी घणाघाती टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलीये. तसंच मुख्यमंत्री फितूर झाले असले तरी सेना फितूर होणार नाही असंही उद्धव ठाकरेंनी ठणकावून सांगितलं.

स्थानिक आणि शिवसेनेचा तीव्र विरोध असतानाही, कोकणातील प्रस्तावित नाणार रिफायनरी प्रकल्पासाठी परदेशी कंपन्यांसोबत सामंजस्य करारावर काल दिल्लीत स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. सौदी अरेबियाची अरामको ही बडी कंपनी नाणार रिफायनरी प्रकल्पात 50 टक्के गुंतवणूक करणार आहे.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या कराराचा समाचार घेत मुख्यमंत्र्यांवर टीका केलीये. एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे उद्धव ठाकरे यांनी या करारावर तीव्र नाराजी व्यक्त केली.

स्थानिकांचा विरोध डावलून नाणारचा रिफायनरी प्रकल्प शिवसेना होऊ देणार नाही. मुख्यमंत्री फितूर झाले असले तरी शिवसेना फितूर नाही. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत नाणारचा प्रकल्प होऊ देणार नाही असा पुनरूच्चार उद्धव ठाकरे यांनी केलीय

First published: April 12, 2018, 5:44 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading