Elec-widget

उद्धव ठाकरे म्हणतात, 'मुंबई तुंबलीच नाही'

उद्धव ठाकरे म्हणतात, 'मुंबई तुंबलीच नाही'

"राजकारण कुणाला करायचे असेल त्यांनी करावे, आम्ही नीच पातळीवर जाणार नाही"

  • Share this:

30 आॅगस्ट : काल मुंबई तुंबलीच नाही, जर पालिकेनं काम केलं नसतं, तर तुम्ही महापौर बंगल्यापर्यंत पोहचूच शकला नसता. तुम्हाला एवढंच असेल तर पाऊस थांबवून दाखवा, असं आवाहनचं शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दिली. राजकारण कुणाला करायचे असेल त्यांनी करावे, आम्ही नीच पातळीवर जाणार नाही असंही उद्धव ठाकरेंनी ठणकावून सांगितलं.

मुंबई मंगळवारी झालेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महापौर विश्वनाथ महाडेश्वर, पालिका आयुक्त अजाॅय मेहता यांच्यासह संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी उद्धव ठाकरेंवर प्रश्नाचा भडीमार केला.

काल 26 जुलैची आठवण होईल असा पाऊस पडला. काही ठिकाणी पाणी साचले हे खरे आहे. पण 2005 च्या तुलनेत यावेळी लोक बाधित झाले नाहीत, हे पालिकेचं यश आहे. एकूण 26 ठिकाणी 50 मिलीमिटर एवढा पाऊस झाला. मुंबईवर 9 किलोमिटरचा ढग होता जर तो फुटला असता तर याही पेक्षा बिकट परिस्थिती झाली असती असा धक्कादायक खुलासाही  उद्धव ठाकरेंनी केला. तसंच शिवसैनिक रस्त्यावर होते, लोकांना मदत करत होते असा दावा उद्धव ठाकरेंनी केला.

उद्धव ठाकरे पत्रकारांवर भडकले

माझा जनतेशी संपर्क नाही असं समजू नका. उलट, माझ्या कार्यकर्त्यांचा जनतेशी जितका संपर्क आहे आणि ज्याप्रकारे तो काल घराघरात गेला, तेवढे तुम्हीही गेले नसाल, असंही उद्धव ठाकरेंनी पत्रकारांनाच सुनावलं.

Loading...

'राजकारण करू नका'

राजकारण कुणाला करायचे असेल त्यांनी करावे, आम्ही नीच पातळीवर जाणार नाही, आम्ही राजकारण त्यांच्यावर उलटवू शकतो असा इशाराही उद्धव ठाकरेंनी दिला.

भाजपला टोला

गोरखपूरमध्ये पुन्हा बालक हत्याकांड झाले, पावसाच्या बातम्यांत ती बातमी वाहून गेली, मी त्या बालकांना श्रद्धांजली वाहतो असं म्हणत उद्धव ठाकरेंनी मुबईच्या स्थितीवर भाजपला टोला लगावला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 30, 2017 06:10 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...