S M L

...तर कुलभूषण जाधव यांना सरकारने वाचवलं पाहिजे -उद्धव ठाकरे

"कुलभूषण जाधव यांना झालेली फाशीची शिक्षा दुर्दैवी आहे. त्याच्यावर अन्याय होत असेल तर सरकारने त्याला वाचवायला हवं"

Sachin Salve | Updated On: Apr 10, 2017 07:27 PM IST

...तर कुलभूषण जाधव यांना सरकारने वाचवलं पाहिजे -उद्धव ठाकरे

10 एप्रिल : कुलभूषण जाधव यांना झालेली फाशीची शिक्षा दुर्दैवी आहे. त्याच्यावर अन्याय होत असेल तर सरकारने त्याला वाचवायला हवं, अशी मागणी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केली आहे.

कुलभूषण जाधव यांना हेरगिरीच्या आरोपांखाली पाकिस्तानमध्ये अटक करण्यात आली होती. आता त्यांना पाकिस्तानमधल्या कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावलीय. गेल्या मार्चमध्ये पाकिस्तानच्या सुरक्षा दलांनी जाधव यांना बलुचिस्तानातून अटक केली होती.

ते भारतीय नौदलातले अधिकारी आहेत आणि  त्यांना रॉ या भारतीय गुप्तचर संस्थेत नेमण्यात आल्याचा दावा पाकने केला होता. आज त्यांना पाक कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. भारताने या निर्णयाचा तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही कुलभूषण यांना वाचवायला पाहिजे अशी मागणी केलीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 10, 2017 07:27 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close