'मातोश्री'ची प्रथा मोडीत, उद्धव ठाकरे-ममतादीदींची भेट हाॅटेलमध्ये !

'मातोश्री'ची प्रथा मोडीत, उद्धव ठाकरे-ममतादीदींची भेट हाॅटेलमध्ये !

"मातोश्री'वर या आधी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, आणि इतर पक्षातल्या प्रमुख नेत्यांनी मातोश्रीवर जाऊन भेटी घेतल्यात"

  • Share this:

02 आॅक्टोबर : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी भेट घेतलीये. पण या भेटीमुळे मातोश्रीची प्रथा मोडीत निघालीये.

राजकारणात 'शत्रूचा शत्रू तो आपला मित्र' अशी म्हणं आहे. याच न्यायानं आज शिवसेना पक्षप्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट झाली. एरव्ही देशातला कोणताही बडा नेता आला तरी उद्धव ठाकरे 'मातोश्री'च्या बाहेर जाऊन त्यांची भेट घेत नव्हते. आज पहिल्यांदा मोदी विरोधासाठी उद्धव ठाकरेंनी 'मातोश्री'बाहेर पडून हॉटेल ट्रायडंटमध्ये ममता दीदींची भेट घेतली. मोदींचे विरोधक म्हणून या दोघांचे एवढे चांगले सूर जुळलेले दिसले की, बैठकीच्या खोलीत, सोफ्यावर बसताना 'पहले आप पहले आप' असंही झालं.

या आधीचा इतिहास पाहता शिवसेनाप्रमुख किंवा शिवसेना पक्ष प्रमुख यांची भेट घेण्यासाठी राष्ट्रीय नेते स्वतः 'मातोश्री'वर जात असत. पण आता मोदी विरोधासाठी स्वतः उद्धव ठाकरे 'मातोश्री' बाहेर पडून इतर राष्ट्रीय नेत्यांच्या भेटी घेतायत. 'मातोश्री'वर या आधी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, आणि इतर पक्षातल्या प्रमुख नेत्यांनी मातोश्रीवर जाऊन भेटी घेतल्यात.

देशात भाजपची एकहाती सत्ता आहे. बहुतांश राज्यातही भाजपची सरकारं आहेत. मोदींचे सर्वात मोठे विरोधक मानले जाणारे नितीशकुमारही भाजपच्या कळपात दाखल झालेत. अशावेळी भाजपसोबत सत्तेत असलेल्या पण मित्र नसलेली शिवसेना ममतादीदींना जवळची वाटू लागलीये. शिवसेना नजीकच्या काळात एनडीए सोडणार नाही. पण मोदीविरोधकांच्या कॅम्पमध्ये आणखी एक भिडू असा हिशोब ठेऊन ममतांनी ही भेट घेतल्याची चर्चा आहे. दुसरीकडे शिवसेनेलाही भाजपला आपलं उपद्रवमूल्य दाखवून देण्यासाठी ही आयतीच संधी मिळालीये.

First published: November 2, 2017, 4:15 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading