28 सप्टेंबर : मी बाळासाहेबांना कधीच त्रास दिला नाही. पण उद्धवनी जो बाळासाहेब यांना त्रास दिला तो जगातल्या कुठल्याच मुलाने आपल्या बापाला दिला नाही असा गंभीर आरोप नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. तसंच मी भाजपमध्ये जाऊ नये म्हणून उद्धव ठाकरेंनी फडणवीस यांना साकडं घातलं असा टोलाही राणेंनी लगावला.
डोंबिवलीमध्ये नारायण राणे यांच्या समर्थकांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात नारायण राणे यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. गेली काही दिवस माध्यमांत नारायण राणे विषयी चर्चा सुरू आहे. पण मी भाजपमध्ये जाणार मला मंत्रिपद मिळणार या भीतीने उद्धव ठाकरे घाबरले. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मला भाजपमध्ये घेऊ नये यासाठी साकडं घातलं. मी सुद्धा शिवसेनेत होतो आतलं काय आणि बाहेरचं काय हे मला सगळं माहीत आहे. बाळासाहेब ठाकरेंना मी त्रास दिला असा आरोप उद्धव करताय. पण पण उद्धवनी जो बाळासाहेब यांना त्रास दिला तो जगातल्या कुठल्याच मुलाने आपल्या बापाला दिला नाही अशी टीका राणेंनी केली.
तसंच मी बाळासाहेबांना जवळून पाहिलं आहे. तुमच्या सगळ्या कुंडल्या माझ्याकडे आहे. त्यामुळे मला जास्त बोलायला लावू नका असा इशाराही राणेंनी दिला.
आज शरद पवार यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीत नारायण सध्या सगळ्या टीव्हीवर तूच दिसतोय असं पवार म्हटल्याचंही राणेंनी सांगितलं.
आपला अंतिम निर्णय 1 आॅक्टोबरला 1 वाजता जाहीर करणार अशी घोषणाही राणेंनी केली.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा