Home /News /mumbai /

'बेस्ट'च्या वादावर उद्धव ठाकरेंची मध्यस्ती निष्फळ; आंदोलकांचं बेमुदत उपोषण

'बेस्ट'च्या वादावर उद्धव ठाकरेंची मध्यस्ती निष्फळ; आंदोलकांचं बेमुदत उपोषण

  मुंबई 26 ऑगस्ट : बेस्टच्या वादावर तोडगा काढण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मध्यस्ती केली. ठाकरे यांनी महापालिकेशी संबंधीत सर्व मंडळींची बैठक घेऊन चर्चा केली. कामगारांच्या प्रतिनिधींशीही ते बोलले मात्र त्यांची ही बोलणी निष्फळ ठरली. तोडगा निघाला नाही तर संप अटळ असल्याची घोषणा कामगारांचे नेते शशांक राव यांनी केलीय. ते म्हणाले, आमची आजची बैठक निष्फळ ठरलीये, त्यामुळे आम्हाला उपोषणाला बसावं लागतंय कामगारांच्या पाठीत खंजीर खुपसण्यात आलाय असा आरोपही राव यांनी केलाय. ते पुढे म्हणाले, शिवसेना बीएमसीत आहे, राज्य सरकारमध्ये पण आहे पण तरीही कामगारांना देण्यात आलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यात आली नाहीये अशी टीकाही राव यांनी केलीये. मुंबईकरांना त्रास होऊ नये म्हणून संप न करता आम्ही बेमुदत उपोषण करतोय. आमच्या शरीरात प्राण असेपर्यंत आम्ही आंदोलन करणार. अगदीच नाईलाज झाला तर मग आम्हाला संपाचे हत्यार उपसावं लागेल असंही राव यांनी म्हटलंय. मंदीमुळे वाहन उद्योगाला बुरे दिन, नाशकात 2 मोठ्या कंपन्यांत नो प्रोडक्शन डे! कामगारांच्या मागण्या मान्य होण्याकरता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मार्ग काढतील असा विश्वास भाजप नेते कालिदास कोळंबकर यांनी व्यक्त केलाय. या संदर्भात आपण स्वत: मुख्यमंत्र्यांशी बोलणार असल्याचं कोळंबकर यांनी म्हटलंय. बेस्ट कामगारांनी प्रलंबित मागण्यांसाठ ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात संपावर जाण्याचा इशारा दिला होता. मात्र, प्रशासन आणि कामगार संघटनांच्या बैठकीनंतर 20 ऑगस्टपर्यंत संप स्थगित करण्यात आला होता. प्रशासनाने कामगारांच्या मागण्यांवर विचार करण्यासाठी 20 ऑगस्टपर्यंत मुदत मागितली होती. आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या बेस्टला कामगारांनी संपाचा इशारा देऊन मोठा झटका दिला होता.

  महापूरात नष्ट झालेल्या पिकासाठीचं सर्व कर्ज माफ होणार!

  बेस्ट वर्कर्स युनियनच्या मुख्य मागण्या... -बेस्ट कर्मचाऱ्यांचा वेतन करार त्वरित व्हावा, जो 31 मार्च 2016 सालीच संपला आहे. -बेस्टचा अर्थसंकल्प पालिका अर्थसंकल्पात विलिनीकरणाचा निर्णय त्वरित लागू व्हावा. -2016 ते 2018 या वर्षातील बोनस कर्मचाऱ्यांना देण्यात यावा. -कर्मचारी निवासस्थानाचा प्रश्न त्वरित मार्गी लावावा. -अनुकंपा भरती सुरू करा. -2007 पासून भरती झालेल्या कर्मचाऱ्यांची 7930 रुपयांच्या मास्टर ग्रेडमध्ये अरिअर्ससह वेतन निश्चिती करावी.
  Published by:Ajay Kautikwar
  First published:

  Tags: Best, Uddhav thackeray

  पुढील बातम्या