22 आॅगस्ट : "कामं होत नाही" अशी तक्रार करणाऱ्या कल्याण डोंबिवलीच्या 52 नगरसेवकांना घेऊन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे खुद्ध मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी 'वर्षा' बंगल्यावर पोहोचले. पण मुख्यमंत्र्यांकडून फक्त आश्वासन पदरात पाडून उद्धव ठाकरे आपल्या मावळ्यांसर परतले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज कल्याण डोंबिवलीच्या 52 नगरसेवकांसह मुख्यमंत्र्यांची वर्षा या निवासस्थानी भेट घेतली.
मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर कल्याण डोंबिवलीच्या नगरसेवकांचा विकास प्रकल्प तातडीने मार्गी लावा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी पालिका आयुक्तांना दिलेत.
यावेळी त्यांच्यासोबत महापालिका आयुक्त आणि खासदार श्रीकांत शिंदे, आणि एकनाथ शिंदे हे सुद्धा सोबत होते. यावेळी सकारात्मक चर्चा झाल्याचं शिवसेना नेत्यांनी सांगितलं.