मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

दिलेला शब्द पाळणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार - संजय राऊत

दिलेला शब्द पाळणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार - संजय राऊत

Ayodhya: Shiv Sena chief Uddhav Thackeray, Yuva Sena chief Aaditya Thackeray, party leader Sanjay Raut along with newly-elected party MPs arrive to offer prayers at the makeshift Ram Lalla temple, in Ayodhya, Sunday, June 16, 2019. (PTI Photo)(PTI6_16_2019_000108B)

Ayodhya: Shiv Sena chief Uddhav Thackeray, Yuva Sena chief Aaditya Thackeray, party leader Sanjay Raut along with newly-elected party MPs arrive to offer prayers at the makeshift Ram Lalla temple, in Ayodhya, Sunday, June 16, 2019. (PTI Photo)(PTI6_16_2019_000108B)

त्यावेळी मी पुन्हा अयोध्येत येईल असं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिलं होतं. ते आश्वासन आता ठाकरे पूर्ण करणार आहेत.

  • Published by:  Ajay Kautikwar

मुंबई 06 जानेवारी : लोकसभा निवडणुकीआधी उद्धव ठाकरे यांनी अयोध्येत जात थेट भाजपला आव्हान दिलं होतं. नंतर भाजप आणि शिवसेनेच दिलजमाई झाली आणि राजकीय परिस्थिती बदलली. त्यावेळी मी पुन्हा अयोध्येत येईल असं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिलं होतं. विधानसभा निवडणुकीनंतर परिस्थिती बदलली आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. त्यामुळे शिवसेना अनेक मुद्यांना थंडबस्त्यात ठेवणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अयोध्येत जाणार असल्याचं जाहीर केलं. ते केव्हा अयोध्येत जातील हे दोन दिवसांमध्ये जाहीर करू असंही राऊत यांनी स्पष्ट केलं.

संजय राऊत म्हणाले, आमची अयोध्येत जाण्याची इच्छा आहे. लोकसभेच्या निकालानंतर उद्धव ठाकरे शिवसेनेच्या खासदारांना घेऊन अयोध्येत गेले होते. महाराष्ट्रात शिवसेनेचे मुख्यमंत्री झालेले आहेत. त्यांना घेऊन आम्ही अयोध्येत जाऊ. दोन दिवसात तुम्हाला तारीख कळेल. शिवसेनेच्या या निर्णयावर काँग्रेस काय प्रतिक्रिया देईल याकडे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

'महाराष्ट्र केसरी' : अभिजित कटके स्पर्धेबाहेर, तर शैलेश शेळके अंतिम फेरीत

दरम्यान आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे म्हणाले,  'दिल्लीत जेएनयूमध्ये झालेला हल्ला हा मुंबईत झालेल्या 26/11 च्या हल्ल्याची आठवण करून देणारा आहे. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी घाबरण्याची आवश्यकता नाही. मी महाराष्ट्रात असा प्रकार खपवून घेणार नाही,' अशी आक्रमक भूमिका मुखमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. तसंच उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाची चौकशी होऊन हल्लेखोरांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

असा आहे 'मनसे'चा नवा झेंडा, 23 जानेवारीला राज ठाकरे करणार मोठी घोषणा

दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (JNU)इथं कॅम्पसमध्ये घुसून विद्यार्थ्यांवर हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात अनेक विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विद्यार्थ्यांवर झालेला हा हल्ला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं (ABVP)केल्याचा डाव्या संघटनांचा आरोप आहे. जेएनयूमधील या हल्ल्याचा महाराष्ट्रातूनही मोठा निषेध केला जात आहे.

First published: