मुंबई 22 जानेवारी : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा जय श्रीरामचा नारा दिलाय. आधी घोषणा केल्या प्रमाणे उद्धव ठाकरे हे सर्व खासदारांना घेऊन अयोध्येत जाणार आहेत. राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारला 100 दिवस पूर्ण झाल्यानिमित्ताने ते अयोध्येत जाणार असल्याची माहिती दिली जातेय. मार्चा पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात ठाकरे हे मंत्री आणि खासदारांना घेऊन अयोध्येत जाणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या आधीही ठाकरे हे अयोध्येला गेले होते. त्यावेळी त्यांनी घोषणा केली होती की मी पुन्हा अयोध्येला येईन. ते आश्वासन पूर्ण करण्यासाठी ते अयोध्येत जावून रामललाचं दर्शन घेणार आहे.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करून ही माहिती दिलीय. ते म्हणाले, सरकार जोरात कामास लागले आहे. पाच वर्षे पुर्ण करणारच! प्रभू श्रीरामाची कृपा.
सरकारला शंभर दिवस पुर्ण होताच मुख्यमंत्री ऊदधव ठाकरे अयोध्येस जातील .श्रीरामाचे दर्शन घेऊन पुढील कार्याची दिशा ठरवतील.
रस्त्याच्या टेंडरवरून शिवसेनेच्या आमदार आणि कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी
2 नोव्हेंबर 2018 रोजी उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदा अयोध्येचा दौरा केला होता. त्यावेळी लोकसभा निवडणुकीची चर्चा जोरात होती. निवडणुकीदरम्यान शिवसेना – भाजपमध्ये राजकीय संबंध देखील ताणले गेले होते. पण, लोकसभा निवडणुकीमध्ये युती केल्यानंतर शिवसेना – भाजपला राज्यात मोठं यश मिळालं.
सरकार जोरात कामास लागले आहे. पाच वर्षे पुर्ण करणारच!
प्रभू श्रीरामाची कृपा.
सरकारला शंभर दिवस पुर्ण होताच मुख्यमंत्री ऊदधव ठाकरे अयोध्येस जातील .श्रीरामाचे दर्शन घेऊन पुढील कार्याची दिशा ठरवतील
लोकसभा निवडणुकीआधी उद्धव ठाकरे यांनी अयोध्येत जात थेट भाजपला आव्हान दिलं होतं. नंतर भाजप आणि शिवसेनेच दिलजमाई झाली आणि राजकीय परिस्थिती बदलली. त्यावेळी मी पुन्हा अयोध्येत येईल असं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिलं होतं. विधानसभा निवडणुकीनंतर परिस्थिती बदलली आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले.
त्यामुळे शिवसेना अनेक मुद्यांना थंडबस्त्यात ठेवणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अयोध्येत जाणार असल्याचं काही आठवड्यांपूर्वीच जाहीर केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.