मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार जिल्ह्यांचा महत्त्वाचा आढावा, लॉकडाउन 3 मध्ये नवीन निर्णयाची शक्यता

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार जिल्ह्यांचा महत्त्वाचा आढावा, लॉकडाउन 3 मध्ये नवीन निर्णयाची शक्यता


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांशी कोरोना व्हायरसच्या परिस्थितीचा आढावा घेणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांशी कोरोना व्हायरसच्या परिस्थितीचा आढावा घेणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांशी कोरोना व्हायरसच्या परिस्थितीचा आढावा घेणार आहे.

  • Published by:  sachin Salve
मुंबई, 03 मे : महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी देशभरात लॉकडाउन वाढवण्यात आलं आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सर्व जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज संध्याकाळी पाच वाजता राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांशी कोरोना व्हायरसच्या परिस्थितीचा आढावा घेणार आहे.   सर्व जिल्ह्याधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा होणार आहे. हेही वाचा -कुलभूषण जाधव यांना सोडवण्यासाठी पाकिस्तानशी बॅक-चॅनल चर्चा: हरीश साळवे राज्यात कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखणासाठी सुरू असलेल्या उपाययोजना तसंच आता लॉकडाउनमध्ये कोणत्या जिल्ह्यांना किती प्रमाणात शिथीलता देता येईल, या संदर्भात चर्चा होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाउनच्या 3 टप्प्याची घोषणा केली होती तेव्हाच त्यांनी स्पष्ट केलं होतं की, 'चौथ्या टप्प्यात लॉकडाउन हे 4 ते 17 मे असणार आहे. राज्यासमोर आर्थिक संकट पाहता ज्या ज्या भागात कोरोनाचा जास्त प्रादुर्भाव वाढला नाही, तिथे काही अटी शिथील केल्या जातील. पण, याचा निर्णय हा टप्प्या-टप्प्याने घेण्यात येईल.' हेही वाचा - 'आता थुंकणं पुन्हा सुरू होईल' सरकारच्या पान शॉपबाबतच्या निर्णयावर रवीनाची नाराजी आज लॉकडाउनचा तिसरा टप्पा हा संपणार आहे. त्यानंतर चौथा टप्प्यातील लॉकडाउनमध्ये ज्या भागात कोरोनाचा जास्त प्रादुर्भाव झाला नाही, अशा जिल्ह्यांची यादी तयार करण्यात आली असून रेड झोन, ऑरेंज आणि ग्रीन झोन अशी विभागणी करण्यात आली आहे. ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये काही प्रमाणात संचारबंदीच्या अटी शिथिल करण्यात आल्या आहे. दुकानं, मद्य विक्रीला परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, केंद्र सरकारने दिलेल्या सूचनेनुसार, राज्यात अडकलेल्या परप्रांतीय मजूर आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या गावी परत जाण्यासाठी व्यवस्था केली जात आहे. नाशिकमधून पहिली रेल्वे भोपाळकडे धावली आहे. तर जिल्ह्या-जिल्ह्यात अडकलेल्या परप्रांतीयांना अर्ज करण्यासाठी राज्य सरकारकडून आवाहन करण्यात आलं आहे. संपादन - सचिन साळवे
First published:

पुढील बातम्या