Home /News /mumbai /

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे उद्या शिवसैनिकांशी साधणार ऑनलाईन संवाद, आगामी निवडणुकांसाठी काय देणार कानमंत्र?

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे उद्या शिवसैनिकांशी साधणार ऑनलाईन संवाद, आगामी निवडणुकांसाठी काय देणार कानमंत्र?

उद्धव ठाकरे शिवसैनिकांसोबत ऑनलाईन संवाद साधणार आहेत. उद्या रात्री आठ वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संवाद साधणार आहेत. यावेळी उद्धव ठाकरे शिवसैनिकांना काय आदेश देतात हे पहावं लागेल.

मुंबई, 22 जानेवारी : राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हे उद्या शिवसैनिकांसोबत संवाद (Uddhav Thackeray will interact with Shivsainik) साधणार आहेत. उद्या ऑनलाईन माध्यमातून उद्धव ठाकरे शिवसैनिकांसोबत संवाद साधणार आहेत. उद्या 23 जानेवारी म्हणजेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे (Balasaheb Thackeray Birth Anniversary). बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरे शिवसैनिकांसोबत संवाद साधून त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. शिवसैनिकांना काय आदेश देणार? येत्या काळात होणाऱ्या महानगरपालिका आणि जिल्हा परिषदा निवडणुका लक्षात घेता शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे शिवसैनिकांना काय आदेश देतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्धव ठाकरे रात्री 8 वाजता शिवसैनिकांसोबत संवाद साधून त्यांना मार्गदर्शन करतील. वाचा : मुंबईतील ताडदेव परिसरात कमला इमारतीला भीषण आग, 15 जखमी तर दोघांचा मृत्यू विरोधकांचा खरपूस समाचार घेणार? गेल्या काही दिवसांपासून प्रकृतीच्या कारणास्तव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घरीच आहेत आणि घरुनच आपली शासकीय कामे पूर्ण करत आहेत. मात्र, असे असताना विरोधकांकडून त्यांच्यावर सातत्याने टीका करण्यात येत आहे. विरोधकांकडून होणाऱ्या टीका आणि आरोप यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय बोलणार आणि विरोधकांचा खरपूस समाचार घेतात का हे पहावं लागेल. आगामी निवडणुकांसाठी शिवसैनिकांना कानमंत्र येत्या काळात मुंबईसह राज्यातील इतरही महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत. तसेच ग्रामीण भागातील जिल्हा परिषदांच्याही निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या संदर्भात उद्धव ठाकरे शिवसैनिकांना मार्गदर्शन करुन काय कानमंत्र देतात हे पहावं लागेल. आता उद्धव ठाकरे यांच्या या ऑनलाईन संवादाकडे सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत. वाचा : 'महात्मा गांधींच्या मारेकऱ्याचे उदात्तीकरण काँग्रेस खपवून घेणार नाही' बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी मोठ्या संख्येने शिवसैनिक हे मुंबईत दाखल होत असतात. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या कोविड संकटामुळे शिवतीर्थावर बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन करणं शिवसैनिकांना शक्य होत नाहीये. त्यामुळेच उद्धव ठाकरे हे शिवसैनिकांना संबोधित करुन मार्गदर्शन करणार आहेत.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Mumbai, Shiv sena, Uddhav thackeray

पुढील बातम्या