News18 Lokmat

युती झाली अधिक घनिष्ठ; अमित शहांचा अर्ज भरण्यासाठी उद्धव ठाकरे जाणार

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा गुजरातमधील गांधीनगर येथून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

News18 Lokmat | Updated On: Mar 29, 2019 08:01 AM IST

युती झाली अधिक घनिष्ठ; अमित शहांचा अर्ज भरण्यासाठी उद्धव ठाकरे जाणार

मुंबई, 29 मार्च: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा गुजरातमधील गांधीनगर येथून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. अमित शहा यांचा उमेदवार अर्ज भरण्यासाठी खुद्ध शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे जाणार आहेत. या घटनेमुळे शिवसेना आणि भाजप युती सर्वात घनिष्ठ झाल्याचे मानले जात आहे.

वाचा-किरीट सोमय्यांचा पत्ता कट झाल्याची माहिती, केंद्रीय मंत्र्याचं नाव चर्चेत

भाजपचे अमित शहा उद्या शनिवारी गांधीनगर लोकसभा मतदार संघातून उमेदवारी अर्ज भरणार आहेत. यावेळी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे देखील उपस्थित रहाणार आहेत. काल रात्रीच अमित शहा यांचा उद्धव ठाकरे यांना फोन आला होता. यावेळी दोन्ही नेत्यांची चर्चा झाली. या चर्चेत अमित शहा यांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी येण्याचं निमंत्रण उद्धव ठाकरेंना दिले होते. उद्धव ठाकरेंनीही अमित शहा यांचं निमंत्रण स्विकारले आहे. त्यामुळे शनिवारी जेव्हा अमित शहा उमेदवारी अर्ज भरतील त्यावेळी उद्धव ठाकरे देखील उपस्थित असणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमुळे युतीतील ही खूप मोठी राजकीय घटना मानली जात आहे. या उपस्थितीमुळे शिवसेना आणि भाजप युतीतील आतापर्यंतचे सर्वाधीक घनिष्ठ संबंध निर्माण झाल्याचे राजकिय वर्तुळात बोलले जात आहे.

लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर भाजपने पहिल्या यादीत पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींचा पत्ता कट करत गांधीनगर येथून अमित शहा यांना उमेदवारी दिली होती. तेव्हापासून हा मतदारसंघ चर्चेत आला आहे.


Loading...

SPECIAL REPORT : पार्थ पवारांचा मावळ जिंकण्याचा मनसुबा, काँग्रेसची नाराजी महागात पडणार?


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 29, 2019 07:41 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...