मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

‘उद्धव ठाकरेच 5 वर्ष मुख्यमंत्री राहणार’, फडणवीसांच्या दिल्ली भेटीवर संजय राऊतांचा हल्लाबोल

‘उद्धव ठाकरेच 5 वर्ष मुख्यमंत्री राहणार’, फडणवीसांच्या दिल्ली भेटीवर संजय राऊतांचा हल्लाबोल

Mumbai: Shiv Sena chief Uddhav Thackeray with his son Yuva Sena chief Aditya Thackeray and Senior Shiv Sena leader Sanjay Raut leave after a meeting with NCP and Congress leaders, at Nehru Centre in Mumbai, Friday, Nov. 22, 2019. (PTI Photo) (PTI11_22_2019_000308B)

Mumbai: Shiv Sena chief Uddhav Thackeray with his son Yuva Sena chief Aditya Thackeray and Senior Shiv Sena leader Sanjay Raut leave after a meeting with NCP and Congress leaders, at Nehru Centre in Mumbai, Friday, Nov. 22, 2019. (PTI Photo) (PTI11_22_2019_000308B)

'राजकीय घडामोडी काही सुरू नाहीत. सबकुछ आलबेल है...और आलबेल रहेगा...ये सरकार पाच साल चलेगी'

मुंबई 17 जुलै:  विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fdnavis) यांच्या दिल्ली भेटीमुळे राजकीय चर्चेला पुन्हा एकदा जोर चढलाय. फडणवीस यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांची भेट घेतली. त्यानंतर ते शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचीही भेट घेणार आहेत. ही भेट कोरोनाची स्थिती आणि शेतीच्या प्रश्नांवर आहे असं सांगितलं जात असलं तरी राज्यातल्या राजकीय स्थितीवर त्यात चर्चा झाल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे. त्यावर संजय राऊत (Shivsena MP Sanjay Rut) यांनी तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली. महाराष्ट्रात 'राजकीय प्रादूर्भाव होणार नाही. कारण आम्ही फवारणीचे पंप घेऊन फिरतोय. राज्यात सर्व आलबेल आहे. सरकारला काहीही धोका नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच सरकार (uddhav Thackeray Government) पाच वर्ष टिकणार असंही त्यांनी स्पष्ट केलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या खासदारांची आज बैठक घेतली. त्या बैठकीनंतर बोलतांना त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, बैठकीत उद्धव ठाकरेंनी शिवसेना खासदारांची मते जाणून घेतली. कोकणामध्ये गणपती उत्सवाबाबत काय भूमिका घ्यावी यावरही चर्चा झाली. बऱ्याच कालावधीनंतर शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला आहे. शिवसेनेचे खासदार एकत्र आले, चर्चेचा मुख्य विषय कोविड उपाययोजना होता. दिल्लीत विरोधी पक्षनेते गेलेत, त्याच्याशी आमच्या बैठकीचा बादरा नारायण संबंध नाही. राजकीय घडामोडी काही सुरू नाहीत. सबकुछ आलबेल है....और आलबेल रहेगा...ये सरकार पाच साल चलेगी... और मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहाब ही रहेंगे ! आम्ही आहोत तोपर्यंत राजकीय प्रादुर्भाव वाढणार नाही. आम्ही फवारणीचे पंप घेऊन आहोत. अमित शहांसोबतच्या बैठकीत नेमकं काय घडलं? देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत (Devendra Fadnavis in Delhi) दाखल झाले आहेत. आज गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांची भेट घेतल्यानंतर शनिवारी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची भेट घेतील. महाराष्ट्र आणि दिल्लीतही कोरोनाचा उद्रेक असतांना फडणवीसांनी दोन दिवसांचा दिल्ली दौरा करणं याला महत्त्व प्राप्त झालं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पक्षाचे खासदार रणजीतसिंह निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे, भाजप नेते हर्षवर्धन पाटीलही दिल्लीत पोहोचले आहेत. आज फडणवीसांनीअमित शहांची भेट घेतली. या भेटीत राज्यातली कोरोनाची स्थिती आणि राजकीय विषयांवरही चर्चा झाल्याची महिती सूत्रांनी दिली. मोदी सरकार चीनला आत्तापर्यंत सर्वात मोठा दणका देणार, तयारी सुरू! मध्यप्रदेशची सत्ता खेचल्यानंतर आता भाजपने राजस्थानवर डाव टाकला आहे. त्यानंतर महाराष्ट्राचा नंबर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे ‘मिशन महाराष्ट्राच्या’ कामगिरीसाठीच फडणवीस दिल्लीत असल्याचीही चर्चा आहे. महाराष्ट्रात हातातोंडाशी आलेला सत्तेचा घास गेल्यामुळे भाजपला ते खूप जिव्हारी लागलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा परत येण्यासाठी भाजपने मोर्चेबांधणीला सुरुवात केली असं म्हटलं जात आहे.
First published:

Tags: Sanjay Raut (Politician), Uddhav thackeray

पुढील बातम्या