डॉक्टर्सच्या मानधनात मोठी वाढ; उद्धव ठाकरे सरकारनं घेतला महत्त्वपूर्ण निर्णय

डॉक्टर्सच्या मानधनात मोठी वाढ; उद्धव ठाकरे सरकारनं घेतला महत्त्वपूर्ण निर्णय

कोरोनाविरुद्ध लढा देण्यासाठी दिवसरात्र झटणाऱ्या डॉक्टरांबाबत राज्य सरकारनं महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

  • Share this:

मुंबई, 29 मे: कोरोनाविरुद्ध लढा देण्यासाठी दिवसरात्र झटणाऱ्या डॉक्टरांबाबत राज्य सरकारनं महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. तो म्हणजे, बंधपत्रित (बॉण्डेड) डॉक्टर्सच्या मानधनात मोठी वाढ करण्याचा तसेच कंत्राटी डॉक्टर्सचे आणि त्यांचे मानधन समान करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हेही वाचा... 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी याबाबत माहिती दिली. कोरोना लढाईला यामुळे निश्चितपणे बळ मिळणार आहे. डॉक्टर्सना सुद्धा यामुळे प्रोत्साहन मिळणार आहे. मानधन देण्यात येईल

डॉक्टरांच्या मानधनात अशी वाढ...

-आदिवासी भागातील बंधपत्रीत डॉक्टर्सना 60 हजारांच्या ऐवजी 75 हजार

-आदिवासी भागातील बंधपत्रीत विशेषज्ज्ञ डॉक्टर्सना 70 हजार ऐवजी 85 हजार

- इतर भागातील एमबीबीएस डॉक्टर्सना 55 हजारांऐवजी 70 हजार

- इतर भागातील विशेषज्ज्ञ डॉक्टर्सना 65 हजारांऐवजी 80 हजार रुपये

फक्त 1 टक्का ICU बेड शिल्लक

दुसरीकडे, देशात कोरोनाबाधितांच्या संख्या दिवसेदिवस वाढत असताना मुंबई हे कोरोनाचं केंद्र झालं आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत केवळ रुग्णांच्या वाढीचं नाही तर रुग्णालयाचंही मोठं संकट आहे. कोरोना रुग्णांचा आकडा वाढत असला तरी, त्यांची सोय करण्यासाठी मुंबई महानगर पालिकेकडे विशेष सोय नसल्याचं दिसत आहे. पालिकेच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत शहरातील 99 टक्के अतिदक्षता विभागातील बेड (ICU Beds) आणि 72 टक्के व्हेंटिलेटर व्यापलेले आहेत. जी रुग्णालयं कोव्हिड-19च्या गंभीर रुग्णांवर उपचार करत आहेत ती देखील 96 टक्के भरले आहेत.

हेही वाचा...

पालिका कर्मचाऱ्यांवरही कोरोनाचं संकट

लोकांच्या सुरक्षेसाठी काम करणाऱ्या पालिका कर्मचाऱ्यांवरही कोरोनाचं संकट आहे. आतापर्यंत पालिकेच्या 1529 फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर कोव्हिड-19 मुळं 25 लोकांचा मृत्यू झाला आहे. सफाई कर्मचारी आणि इतर विभागातील कर्मचारी कोरोनाच्या संकटातही काम करत असल्यामुळं त्यांना या व्हायरसचा धोका आहे. पीपीई किट आणि इतर सुविधाही कमी पडत असल्यामुळं सध्या पालिकेच्या कर्मचाऱ्यांवर कोरोनाचं संकट आलं आहे.

First published: May 29, 2020, 5:37 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading