उद्धव ठाकरेंसोबत रश्मी ठाकरे सुद्धा अयोध्या दौऱ्यावर जाणार

आज दुपारी उद्धव ठाकरे फैजाबादमध्ये विशेष विमानाने दाखल होणार आहे

News18 Lokmat | Updated On: Nov 24, 2018 09:15 AM IST

उद्धव ठाकरेंसोबत रश्मी ठाकरे सुद्धा अयोध्या दौऱ्यावर जाणार

24 नोव्हेंबर : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा अयोध्या दौरा चांगलाच वादळी ठरण्याची शक्यता आहे. आज दुपारी 2 वाजता उद्धव ठाकरेंचं फैजाबाद विमानतळावर आगमन होईल. त्यानंतर अयोध्येतील त्यांच्या विविध नियोजित कार्यक्रमांची सुरुवात होईल. उद्धव ठाकरेंसोबत आदित्य ठाकरेही अयोध्येला जाणार आहेत. तसंच त्यांच्यासोबत रश्मी ठाकरे याही सोबत जाणार आहे.


आज दुपारी उद्धव ठाकरे फैजाबादमध्ये विशेष विमानाने दाखल होणार आहे. त्यांच्या सोबत पत्नी रश्मी ठाकरे, मुलगा आदित्य ठाकरे हे देखिल उपस्थित असणार आहेत. सर्वात प्रथम अयोध्येतील लक्ष्मण किल्ल्यात उद्धव ठाकरे दाखल होणार आहे. याच ठिकाणी राम मंदिरासाठी शिवसेनेनं घेतलेल्या आक्रमक भूमिकेबद्दल अयोध्येतील साधू संत आणि महंत यांच्या उपस्थितीत उद्धव ठाकरेसाठी आशिर्वादोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला आहे.


याच सोहळ्यात उद्धव ठाकरे छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मं स्थळ किल्ले शिवनेरीवरील मातीचा कलश राम मंदिर निर्माणासाठी साधू संत आणि महंतांना सूपुर्द करतील. या सोहळ्यात उद्धव ठाकरे उपस्थित साधू संत आणि महंतांशी राम मंदिर निर्माणासाठी चर्चाही करणार आहेत. त्यानंतर अयोध्येतील शरयू नदीच्या किनारी आरती करण्यासाठी  उद्धव ठाकरे उपस्थित रहाणार आहेत.

Loading...


उत्तर प्रदेशात गंगा आरती प्रमाणेच आता शरयू आरतीचंही महत्व आहे. या दोनही सोहळ्यासांठी शिवसेनेनं जय्यत तयारी केलीय. महाराष्ट्र आणि देशभरातून मोठ्या संख्येने शिवसैनिक अयोध्येत दाखल झालेत. त्यामुळे वातावरणात काहीसा तणावही दिसून येतोय.


अयोध्येत नेहमीच कडक सुरक्षा असते मात्र आज आणि उद्या शिवसेनेच्या दौऱ्यामुळे लष्कर आणि पोलिसांच्या अधीक तुकड्या मागवून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला.   कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून उत्तर प्रदेश पोलिसांकडून पूर्ण खबरदारी घेतली जात आहे.


उद्धव ठाकरे यांचा अयोध्या दौरा'


24 नोव्हेंबर 2018  

1) दु. 2 वाजता फैजाबाद विमानतळावर आगमन

2) दु.3 वाजता लक्ष्मण किला, अयोध्या

श्री विध्वंत संत पूजन आणि आशिर्वादोत्सव

3) संध्याकाळी 5.15 वाजता नया घाट अयोध्या, शरयू नदी आरती


25 नोव्हेंबर 2018 रोजीचे कार्यक्रम


1) स. 9 वाजता - श्री राम जन्मभूमी दर्शन, अयोध्या

2) दु. 12 वाजता - अयोध्येत पत्रकार परिषद

3) दु. 1 वाजता - जनसंवाद होण्याची शक्यता

4) दु. 3 वाजता - फैजाबाद विमानतळावरून मुंबईकडे


दरम्यान, 'जय श्रीराम', 'जय भवानी, जय शिवाजी', असा जयघोष करत शिवसैनिक अयोध्येत पोहोचले आहे. रेल्वेनं फैजाबादला पोहोचल्यावर जय श्रीरामचा जयघोष झाला. प्लॅटफॉर्मवर तुडुंब गर्दी आणि तितकाच उत्साह ओसंडून वाहत होता. दरम्यान, सेनेच्या कार्यकर्त्यांनी अयोध्येला पोहोचताच एकच आनंद व्यक्त केला आणि मंदिर बनवूनच जाणार असल्याचा नाराही त्यांनी दिलाय.


=====================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 24, 2018 07:27 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...