उद्धव ठाकरेंच्या मंचावर 'बळीराजा'स मान.. आत्महत्याग्रस्त कुटुंबासह 400 शेतकऱ्यांना निमंत्रण

उद्धव ठाकरेंच्या मंचावर 'बळीराजा'स मान.. आत्महत्याग्रस्त कुटुंबासह 400 शेतकऱ्यांना निमंत्रण

शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न अखेर पूर्ण होणार

  • Share this:

मुंबई,28 नोव्हेंबर:शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न अखेर पूर्ण होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज (शुक्रवार) संध्याकाळी मुहूर्त 6 वाजून 40 मिनिटांला शिवाजी पार्कवर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. शिवतीर्थावर उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नेते शपथ घेणार आहे. शपथविधीसाठी 'शिवराज्यभिषेक' ही थीम आहे तर भला मोठा स्टेज उभारण्यात आला आहे. शिवाजी पार्कमध्ये 30 हजार खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. दादर परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त करण्यात आला आहे. शिवाजी पार्कवर होणारा शपथविधी सोहळा पाहण्यासाठी तब्बल एक लाखावर लाेक येण्याची शक्यता आहे.

उद्धव ठाकरे यांच्या मंचावर 'बळीराजा'स मान

शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा म्हणून 85 किलोमीटर अनवाणी चालत विठुरायाला साकडे घालणाऱ्या शिवसैनिकाची इच्छा अखेर पूर्ण झाली. शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि राज्याचे भावी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या दाम्पत्याचा सन्मान करण्यासाठी खास निमंत्रण दिले आहे. यासोबतच शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबासह सुमारे राज्यातील 400 शेतकऱ्यांना निमंत्रण देण्यात आले आहे.

सांगलीच्या जत तालुक्यातील बनाळी येथील शिवसैनिक संजय सावंत आणि त्यांच्या पत्नी रूपाली सावंत हे दोघे बनाळीपासून पंढरपूरपर्यंत अनवाणी चालत आले होते. यासाठी त्यांना तीन दिवसांचा कालावधी लागला होता. पंढरपुरात येऊन त्यांनी विठ्ठलास साकडे घातले की, 'मुख्यमंत्री शिवसेनेचा व्हावा'.यानंतर त्यांनी चंद्रभागा पाण्याने भरलेला कलश आणि तुळशी अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करण्यासाठी आलेल्या उद्धव ठाकरे यांना भेट दिली. या शपथविधी सोहळ्याचे सावंत दाम्पत्याला विशेष निमंत्रण आले आहे.

स्वगृही परतलेल्या अजित पवारांनाही मंत्रिपद

अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर ते स्वगृही परतले आहे. त्यांना राष्ट्रवादीकडून मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरेंसोबत अजित पवारही मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. तर विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाची चर्चा आहे. काँग्रेसला उपमुख्यमंत्रिपद आणि विधानसभा अध्यक्षपद अशी दोन्ही महत्त्वाची खाती हवी आहेत. मात्र त्याबाबत महाविकास आघाडीत अद्यापही एकमत झाले नाही. मात्र, काँग्रेसकडून ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाची वर्णी लागण्याची शक्यता आहे.

24 तासांत उभारले 6000 चौरस मीटरचे व्यासपीठ...

उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीसाठी राज्याभिषेकासारखी सोहळ्याची तयारी सुरू आहे. या सोहळ्यासाठी कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई भव्य व्यासपीठ उभारत आहेत. 24 तासांत 60 हजार चौरस मीटरचे व्यासपीठ उभारले जात आहे. बाळासाहेब ठाकरे स्मृतिस्थळाच्या बाजूला व्यासपीठामागे शिवरायांचा पुतळा व समोर शिवराज्याभिषेकाचे शिल्प असणार आहे. महाराष्ट्राची भव्यता व इतिहास या मंचाद्वारे मांडला जाईल. मंचावर 100 जणांच्या बसण्याची सोय असेल. 30 हजार खुर्च्या टाकण्यात येणार आहेत. या कार्यक्रमासाठी सुमारे 1 लाख लोक येथील अशी अपेक्षा आहे. तसेच 20 ते 25 भव्य एलईडी स्क्रीनही असतील.

First published: November 28, 2019, 8:56 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading