फक्त गायच नाही तर देश वाचवा, उद्धव ठाकरेंची मोदींवर टीका

फक्त गायच नाही तर देश वाचवा, उद्धव ठाकरेंची मोदींवर टीका

तसंच मध्यावधी निवडणूक लागल्या तर शिवसेना तयार आहे असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

  • Share this:

03 मे : फक्त गायच नाही तर देश वाचवण्याची गरज आहे, देश वाचला तर गाय वाचेल असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे पंतप्रधान मोदींवर टीका केली. तसंच मध्यावधी निवडणूक लागल्या तर शिवसेना तयार आहे असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

मुंबईत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचं प्रशिक्षण शिबिर पार पडलं. एनडीएच्या बैठकीनंतर उद्धव ठाकरे भाजप सरकारवर बरसले नव्हते. पण आजच्या या शिबिरात उद्धव ठाकरेंनी भाजपवर सडकून टीका केली. शिवसेनाप्रमुखांना आताचं देशातलं हिदुत्व मंजूर नसल्याचं त्यांनी सांगितलं.

निवडणुकींच्या आधी चाय पे चर्चा...निवडणूक जिंकल्यानंतर गाय पे चर्चा नाही तुम्ही गायींना वाचवा. आता तुम्हाला तिला गोमांता म्हणायचं असेल तर गोमांता म्हणा. ज्यांना सावरकरांचे विचार मानायचे असेल तर ते सुद्धा हिंदुत्ववादी. सावरकरांच्या विचारांप्रमाणे गाय हा उपयुक्त पशू आहे. मग कुणी हिंदू असा बोलला तर तो हिंदू नाही. मग आता कुणी गायींसाठी आधार कार्ड काढतंय. गाय वाचवा पण आधी देश वाचवा. देश वाचला तर आपण वाचू असा सल्लावजा टोला उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला.

'मतदारांशी नम्रपणे वागा'

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे मतदारांशी नम्रपणे वागा. बाळासाहेब सही करतांना सुद्धा आपला नम्र असं लिहायचे. त्यामुळे मतदारांशी नम्रपणे वागा. निवडून येण्याआधी झुकलेले असता आणि निवडून आल्यानंतर ताठ होतात असं होता कामा नये असा सल्लाही त्यांनी शिवसैनिकांना दिला.  तसंच शनिवारपासून महाराष्ट्र दौऱ्यावर जाणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 3, 2017 07:17 PM IST

ताज्या बातम्या