उद्धव ठाकरे मुख्यमंत्री फडणवीसांची 'वर्षा'वर घेणार भेट !

शिवसेनेनं युती तोडू नये यासाठी भाजप नेतृत्त्व शिवसेनेची मनधरणी करत असल्याचं वृत्त राजकीय वर्तुळातून पुढे येतंय.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Feb 15, 2018 07:19 AM IST

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री फडणवीसांची 'वर्षा'वर घेणार भेट !

15 फेब्रुवारी : शिवसेनेचे पक्षप्रमुख  उद्धव ठाकरे गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. सिंधुदुर्गातल्या प्रस्तावित नाणार प्रकल्पगस्तांसोबत उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांची वर्षा बंगल्यावर भेट घेणार असल्याचं कळतंय.

रत्नागिरीतल्या नाणार ऑईल रिफायनरीवरून कोकणातलं राजकारण चांगलंच तापलंय. नारायण राणे विरूद्ध शिवसेना असा सामना या निमित्तानं सुरू झालाय. नारायण राणे यांनी एकीकडे मंत्रिपदात वर्णी लागणार असा दावा केलाय. तर दुसरीकडे शिवसेनेवर नाणार प्रकल्पावरून प्रहार केलाय. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे नाणार प्रकल्पगस्तांना सोबत घेऊन वर्षा बंगला गाठणार आहे.

विशेष म्हणजे, मागील महिन्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने सभेत उद्धव ठाकरे यांनी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत स्वबळावर लढण्याचा इशारा दिला होता. हा इशारा दिल्यानंतर उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात भेट होणार आहे. त्यामुळे उद्या होणाऱ्या बैठकीकडे राजकीय वर्तुळीचं लक्ष असणार आहे.

दरम्यान, शिवसेनेनं युती तोडू नये यासाठी भाजप नेतृत्त्व शिवसेनेची मनधरणी करत असल्याचं वृत्त राजकीय वर्तुळातून पुढे येतंय. गुरुवारच्या उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला हा देखील कांगोरा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 14, 2018 11:21 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...