Elec-widget

उद्धव ठाकरे आज करणार मुंबईतल्या नालेसफाईच्या कामांची पाहणी

उद्धव ठाकरे आज करणार मुंबईतल्या नालेसफाईच्या कामांची पाहणी

एवढं सर्व करूनही, मुंबईकरांना तुंबलेले नाले आणि त्यामुळे पावसाचं साचणारं पाणी, यातूनच मार्ग काढावाच लागतो. मुंबईकरांना दरवर्षी येणारा हा अनुभव याही वर्षी पुन्हा येणार का?

  • Share this:

09 मे : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे सालाबादप्रमाणे याही वर्षी नासेसफाईच्या दौर्यावर निघत आहेत. त्या संदर्भात आढावा बैठका देखील सुरू आहेत. पण एवढं सर्व करूनही, मुंबईकरांना तुंबलेले नाले आणि त्यामुळे पावसाचं साचणारं पाणी, यातूनच मार्ग काढावाच लागतो. मुंबईकरांना दरवर्षी येणारा हा अनुभव याही वर्षी पुन्हा येणार का?

मे महिन्यात शाळांना सुट्टी लागते,  आयपीएल सुरू होतं, तस मुंबईत आणखी एक इव्हेंट असतो तो म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा नालेसफाई पाहणी दौराला. यावर्षीही उद्धव ठाकरे दौऱ्यावर निघणार आहेत.   सालाबादप्रमाणे यावर्षीही या दौऱ्यात काही वेगळं नसणारे. दौऱ्यानंतर उद्धव ठाकरे काय बोलतील तेही गेल्यावर्षीपेक्षा फार काही वेगळं नसेल.

गेल्या तीन-चार वर्षांपासून सत्ताधारी पक्षाचे प्रमुख नुसती आश्वसनं देतायेत. पण जेंव्हा प्रत्यक्ष पावसाला सुरवात होते. तेव्हा मुंबईची तुंबईच होते.

दौरा होतो... आश्वासन दिली जातात... गाळ जैसे थे... नाला जैसे थे...  आता बघूया या नालेसफाईवर खर्च किती होतो. 2016मध्ये महापालिकेनं मोठ्या नाल्यांवर 70 कोटी, लहान नाल्यांवर 40 कोटी आणि मिठी नदीच्या सफाईसाठी 50 कोटी म्हणजे 2016 मध्ये तब्बल 160 कोटी रुपये खर्च फक्त नालेसफाईवर करण्यात आला आहे.  तर यावर्षेचा मोठ्या नाल्यांवर 60 कोटी, लहान नाल्यांवर 29 कोटी रुपये आणि मिठी नदीवर 39 कोटी, म्हणजे एकूण 128 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.

तर सालाबादाप्रमाणे यावर्षीही उद्धव ठाकरे दौऱ्यावर निघणार आहेत, पण परिस्थिती बदलण्याची काही चिन्हं नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 9, 2017 12:30 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...