उद्धव ठाकरे आज भरणार विधान परिषदेचा अर्ज, निवडणूक आयोग लवकरच करेल मोठी घोषणा

उद्धव ठाकरे आज भरणार विधान परिषदेचा अर्ज, निवडणूक आयोग लवकरच करेल मोठी घोषणा

कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता प्रत्यक्ष मतदानाची वेळ येऊ नये, आणि निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची इच्छा होती.

  • Share this:

मुंबई, 11 मे : विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसने दिलेल्या सहाव्या उमेदवारामुळे निर्माण झालेल्या वादावर अखेर पडदा पडला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसाठी महत्त्वाची असलेली विधान परिषदेची निवडणूक आता बिनविरोध होणार आहे. आज मुख्यमंत्र्यांसह सर्वच उमेदवार आपला अर्ज दाखल करणार आहे.

विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या 9 जागांसाठी आज महाविकास आघाडीचे 5 उमेदवार अर्ज दाखल करणार आहेत. अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारीमुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. रविवारीच महाविकास आघाडीचा तिढा सुटल्यामुळे ही निवडणूक आता बिनविरोध होत आहे हे स्पष्ट झालं आहे.

हेही वाचा - कोरोनाचं केंद्र झालेल्या वुहानमधून 36 दिवसांनी पहिल्यांदाच आली वाईट बातमी

कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता प्रत्यक्ष मतदानाची वेळ येऊ नये, आणि निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची इच्छा होती. त्यामुळे आज उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर येत्या 14 मे पर्यंत उमेदवारी मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. तर 21 मे रोजी मतदानाची तारीख आहे.

पण त्याच पूर्वीच विधान परिषदेच्या 9 जागांसाठी महाविकास आघाडीचे 5 आणि भाजपचे 4 असे एकूण 9 उमेदवार रिंगणात असल्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोग सर्व उमेदवारांना बिनविरोध विजयी घोषित करेल.

या निवडणुकीतून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधान परिषदेचे सद्स्य बनणार असल्यामुळे, महाविकास आघाडीची राज्यातील सत्ता आता स्थिर राहणार आहे.

कोणत्या पक्षाकडून कुणाला उमेदवारी जाहीर?

तर शिवसेनेकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नीलम गोऱ्हे यांचं नाव निश्चित झालं आहे. तर राष्ट्रवादीकडून शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

काँग्रेसकडून राजेश राठोड यांना  उमेदवारी देण्यात आली आहे, त्यांच्या नावाची घोषणा खुद्द दिल्लीतून करण्यात आली आहे.

हेही वाचा - दारुच्या होम डिलिव्हरीसाठी मद्य निर्माते आणि रेस्टॉरटं मालकही सरसावले...

भाजपने विधान परिषद निवडणुकीसाठी दिग्गज नेत्यांना डावललं आहे.  भाजपकडून विधानपरिषदेसाठी यावेळी नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. डॉक्टर अजित गोपचडे, प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर आणि रणजितसिंह मोहिते यांना भाजपने उमेदवारी दिली आहे.

संपादन - सचिन साळवे

First published: May 11, 2020, 8:50 AM IST

ताज्या बातम्या