Covid -19 युद्धात मदतीसाठी उद्धव ठाकरेंनी मानले मुकेश आणि नीता अंबानींचे आभार

Covid -19 युद्धात मदतीसाठी उद्धव ठाकरेंनी मानले मुकेश आणि नीता अंबानींचे आभार

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना अनेक दिग्गज व्यक्ती मदतीसाठी पुढे आले आहेत

  • Share this:

मुंबई, 1 जून : महाराष्ट्रात वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या भीती वाढवणारी असली तरी अनेकजण मदतीसाठी पुढे येत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिष्ठित उद्योगपती, व्यवस्थापकीय संचालक आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अंबानी आणि रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्ष नीता अंबानी यांचे आभार व्यक्त केले. कोविड -19 च्या लढ्यात मदत केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी ट्विट करुन धन्यवाद व्यक्त केले आहे.

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरील ट्विटमध्ये त्यांनी  लिहिले आहे की- “महाराष्ट्रातील कोविड बचाव कार्यात मदत केल्याबद्दल आम्ही नीताजी आणि मुकेशजी यांचे आभार मानतो. राज्य सरकारद्वारा तयार केल्या जाणाऱ्या फील्ड हॉस्पिटल व्यतिरिक्त अंबानी कुटुंबीयांनी जिओ वर्ल्ड सेंटरला अत्याधुनिक आयसोलेशन केंद्रात रूपांतरित केले आहे. "

यापूर्वी कोरोना व्हायरस महासाथीचा सामना करण्यासाठी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने पीएम केअर्स फंडात 500 कोटी रुपयांचे अनुदान जाहीर केले होते. या व्यतिरिक्त कंपनीने महाराष्ट्र व गुजरातचे मुख्यमंत्री मदत निधीला 5-5 कोटी रुपयांचे अनुदान जाहीर केले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही रिलायन्स इंडस्ट्रीजने कोरोनाच्या युद्धात सामान्य लोकांना मदत करण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचे कौतुक केले आहे. पंतप्रधान म्हणाले की कोविड – 19 विरुद्धच्या लढ्यात रिलायन्सची संपूर्ण टीम प्रभावी योगदान देत आहे. हे आरोग्यसेवा असो किंवा लोकांना मदत करणे या सर्व गोष्टींमध्ये ते सक्रीय आहेत.

विशेष म्हणजे, महाराष्ट्रात सध्या कोरोना विषाणूचे रुग्ण सर्वाधिक आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत 67,655 प्रकरणे नोंदवली गेली आहेत, त्यापैकी 36 हजारांहून अधिक सक्रिय प्रकरणे आहेत. राज्यात 29 हजाराहून अधिक लोक बरे झाले आहेत तर 2286 लोकांचा बळी गेला आहे.

हे वाचा-भारतात एका महिन्यात 5 पटीने वाढले कोरोनाचे रुग्ण, जून असेल अधिक धोकादायक

 

First published: June 1, 2020, 10:13 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading