Home /News /mumbai /

''उद्धव बेटा, मला तुला भेटायचे आहे'' मुख्यमंत्र्यांच्या शिक्षिकेची विनंती

''उद्धव बेटा, मला तुला भेटायचे आहे'' मुख्यमंत्र्यांच्या शिक्षिकेची विनंती

या वृद्धाश्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray), मनसे अध्यक्ष राज ठाकरे तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांचे शिक्षकही आहेत.

    मुंबई, 26 मे: मुंबईत आलेल्या तौक्ते चक्रीवादळाचा (cyclone Tauktae) तडाखा अनेक ठिकाणी बसला. या चक्रीवादळाचा फटका वसईतल्या वृद्धाश्रमालाही बसला. 17 मे रोजी झालेल्या चक्रीवादळात या वृद्धाश्रमाचे छप्पर उडाले. यात न्यू लाइफ फाऊंडेशनच्या पहिल्या मजल्यावरील खिडकीचं पॅनेल कोसळून एक ज्येष्ठ नागरिक जखमीही झाला. या वृद्धाश्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray), मनसे अध्यक्ष राज ठाकरे तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांचे शिक्षकही आहेत. त्यापैकीच एका शिक्षकानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे वृद्धाश्रम व्यवस्थित करण्याची विनंती केली आहे. या चक्रीवादळात वृद्धाश्रमाचं खूप मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे या वृद्धाश्रमातील वृद्धांना जगणं मुश्किल झालं आहे. मुख्यमंत्र्यांच्या शिक्षिका सुमन रणदिवे (Suman Laxmikant Randive) यांनी वृद्धाश्रमाचं काम करावं अशी विनंती केली आहे. 88 वर्षांच्या सुमन लक्ष्मीकांत रणदिवे या दादर येथील बालमोहन विद्यामंदिर या शाळेतून 1991 साली निवृत्त झाल्या. त्या मुलांना गणित आणि विज्ञान हे विषय शिकावयचे. हेही वाचा- मुंबई: स्तनपान देणाऱ्या मातांच्या लसीकरणासाठी BMC चा मोठा निर्णय मिड डेनं दिलेल्या वृत्तानुसार, राजेश आणि सरिता मोरु हे वृद्धाश्रम चालवतात. या पावसात वृद्धाश्रमतील वृद्धांचे बेड्स भिजले. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून त्यांना नीट झोपता ही येत नाही. मिडच्या वृत्तानुसार, ज्यावेळी या वृद्धाश्रमाला भेट दिली. तेव्हा या वृद्धांचे बेड्स आणि कपडे उन्हामध्ये सुकण्यासाठी घातले होते. रणदिवे यांनी आपल्या जुन्या विद्यार्थ्यांकडे हे वृद्धाश्रम लवकरात लवकर व्यवस्थित करण्याची विनंती केली आहे. हेही वाचा-अन् राज ठाकरे झाले भावूक,  पत्र पाठवून कार्यकर्त्यांना दिला धीर लवकरात लवकर वृद्धाश्रम व्यवस्थित करावं जेणेकरुन आम्हाला रात्रीचं शांतपणे झोपता येईल, अशी विनंती शिक्षिका रणदिवे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. मिडशी बोलताना रणदिवे यांनी म्हटलं की, या चक्रीवादळामुळे आमच्या वृद्धाश्रमाचे छप्पर उडाले आहे. आम्ही सगळे वृद्ध असल्यामुळे रात्री झोपायला खूप त्रास होत आहे. मच्छरही खूप चावतात. उद्धव बेटा, मला तुला भेटायचे आहे. तू शिवाजी पार्कमध्ये शाळेत असताना मी तुला शिकवले होते. इथली परिस्थिती खूप खराब झाली आहे. कृपया आम्हाला मदत कर, अशी विनंती मुख्यमंत्र्यांच्या शिक्षकेनं त्यांच्याकडे केली आहे. गेल्या वर्षी रणदिवे या वृद्धाश्रमात आल्याचं राजेश मोरु यांनी सांगितलं. त्यांच्या पतीचं 2014 साली निधन झालं. माझ्या मुलाचं वयाच्या पहिल्या वर्षी निधन झालं, असं रणदिवेंनी सांगितलं. वृद्धाश्रमात त्यांना टीचर म्हणून अशी हाक मारतात.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Cm, Cyclone, Mumbai, Uddhav thackeray

    पुढील बातम्या