पाकड्यांशी आता 'गन की बात करा', उद्धव ठाकरेंचा मोदींना टोला

'काश्मीर पेटलेला आहेच. आता पंतप्रधानांना एकच सांगायचे आहे. मन की बात बंद करून पाकड्यांना आता 'गन की बात करा'

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: May 3, 2017 12:18 AM IST

पाकड्यांशी आता 'गन की बात करा', उद्धव ठाकरेंचा मोदींना टोला

02 मे : 'काश्मीर पेटलेला आहेच. आता पंतप्रधानांना एकच सांगायचे आहे. मन की बात बंद करून पाकड्यांना आता 'गन की बात करा' असा टोला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लगावला.

मुंबईत रंगशारदा सभागृहात शिवसेनेचा मेळावा पार पडला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपवर शेलक्या शब्दात टीका केली. 'नुसतंच काय आम्ही माहापालिकेचे राखणदार, काय फक्तं दांडा आपटत बसणारययय दरवाज्यावर म्हणे हे पहारेकरी. हे असे पहारेकरी नकोत...जागते रहो...जागते रहो...असं म्हणणाऱ्या या पहारेकरींना अर्थ नाही अशी खिल्ली उद्धव ठाकरेंनी उडवली.

मुंबईतलं एक ही झाड विनाकारण कापता नये. एकीकडे गाय वाचवायची आणि दुसरीकडे इमारत बांधण्यासाठी झाडे तोडली जातात अशा टोलाही त्यांनी लगावला.

सोयी प्रमाणे विकास आराखडे बनवले जातात. त्यांना कागदावरची मुंबई माहीत आहे. आपल्याला तळागाळातील मुंबई माहीत आहे. उगाच काहीतरी कागदावर उभ्या आढव्या रेषा मारल्या म्हणजे विकास आराखडा नाही. तो आम्हाला मान्य नाही असंही उद्धव म्हणाले.

मेट्रो चा मार्ग दाखवताना तुम्ही जसं रेल्वे स्टेशन कुठे आहे हे दाखवात. तसंच रहिवाश्यांचं पुनर्विकास कुठे आणि कसा करणार हे देखील आम्हाला तसंच दाखवा असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी आरेमध्ये कारशेड नकोच असं ठणकावून सांगितलं. तसंच हा कारशेड कांजुरमार्गला होऊ शकतो. पण त्यासाठी १८०० कोटी रुपये खर्चं येऊ शकतो. मुंबईतून २ लाख कोटी कर मिळतो मग मुंबईसाठी १८०० कोटी रुपये का नाही खर्चं करत? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 2, 2017 08:09 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...