Home /News /mumbai /

'उद्धव ठाकरे लवकर बरे व्हावे' ममतादीदींची सिद्धिविनायकाकडे प्रार्थना; दिला 'जय मराठा जय बांगला'चा नारा

'उद्धव ठाकरे लवकर बरे व्हावे' ममतादीदींची सिद्धिविनायकाकडे प्रार्थना; दिला 'जय मराठा जय बांगला'चा नारा

 तृणमुल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (mamata banerjee) मुंबई दौऱ्यावर आहे

तृणमुल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (mamata banerjee) मुंबई दौऱ्यावर आहे

तृणमुल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (mamata banerjee) मुंबई दौऱ्यावर आहे.

    मुंबई, 30 नोव्हेंबर : तृणमुल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (mamata banerjee) मुंबई दौऱ्यावर आहे. आज संध्याकाळी त्यांनी सिद्धीविनायक मंदिराला (mumbai siddhivinayak mandir) दर्शनासाठी आल्या होत्या. यावेळी ममतादीदींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackey) यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना केली. तसंच, 'जय मराठा, जय बांगला' असा नाराही त्यांनी दिला. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला चारीमुंड्या चित करणाऱ्या ममता बॅनर्जी आज मुंबईमध्ये दाखल झाल्या. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या मुलीच्या लग्नाच्या रिसेप्शन सोहळ्याला उद्या ममतादीदी हजर राहणार आहे. आज संध्याकाळी त्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे. या भेटी ममतादीदींनी सिद्धीविनायक गणपतीला भेट दिली. यावेळी ममतादीदींच्या हस्ते गणरायाची आरती पार पडली. यावेळी अभिनेते आणि सेनेचे नेते आदेश बांदेकर यांनी ममतादीदींचं स्वागत केलं. मोठी बातमी ! मराठा आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी 10 लाख 'गणपती बप्पा मोरया, अनेकदा मुंबईत आले पण इथx यायला जमलं नव्हतं. अत्यंत प्रसन्न असं हे ठिकाण आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरात लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना गणरायाकडे केली, असं ममतादीदींनी यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितलं. तसंच, सर्व लोकांनी मला खूप चांगलं मुंबईचं दर्शन घडवलं. यावेळी बोलताना ममतादीदींनी 'जय मराठा जय बांगला' असा नाराही दिली. आज संध्याकाळी ममतादीदी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे. त्यानंतर उद्या दुपारी 1.45 वाजेच्या सुमारास वाय बी चव्हाण सेंटर येथे सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींसोबत बैठकीला हजर राहणार आहे.  त्यानंतर दुपारी 3.15 वाजेच्या सुमारास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवास्थानी भेट घेणार आहे. त्यानंतर रात्री संजय राऊत यांच्या मुलीच्या लग्नाच्या Reception सोहळ्यात हजर राहणार आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Mamata banerjee

    पुढील बातम्या