मुलाच्या हट्टासाठी 45 कोटी, राम मंदिरासाठी  फक्त 1 कोटी; निलेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका

मुलाच्या हट्टासाठी 45 कोटी, राम मंदिरासाठी  फक्त 1 कोटी; निलेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका

निलेश राणे यांनी या आधीही शेलक्या भाषेत उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती.

  • Share this:

मुंबई 08 मार्च : अयोध्या भेटीवर गेले असताना मुख्यंत्री उद्धव ठाकरे यांनी राम मंदिरासाठी 1 कोटींची देणगी जाहीर केली होती. त्यांच्या या देणगीवर माजी खसदार निलेश राणे यांनी सडकून टीका केलीय. मुलाच्या पेंग्विन हट्टासाठी 45 कोटी खर्च केले, मात्र राम मंदिरासाठी फक्त 1 कोटी दिले. याचं तुम्हाला कसं काहीच वाटत नाही असा सवालही त्यांनी उद्धव ठाकरे यांना विचारला आहे. निलेश राणे यांनी या आधीही शेलक्या भाषेत उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. मुंबईतल्या जीजामाता उद्यानात मुंबई महापालिकेने पेंग्विन आणले होते. त्यासाठी 45 कोटींचा खर्च आला होता. त्यावरून वादही झाले होते. त्याच विषयाचा संदर्भ घेऊन निलेश राणे यांनी ही टीका केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी अयोध्येत रामल्लांचं दर्शन घेतलं. उद्धव ठाकरे यांचा हा तिसरा अयोध्या दौरा आहे. अयोध्येत पोहोचल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी महत्त्वाची घोषणा केली. अयोध्येत प्रस्तावित राम मंदिरासाठी शिवसेनेच्या ट्रस्टकडून 1 कोटी रुपयांची देणगी उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली. मंदिर बांधकामात फुल नाही तर फुलाची पाकळी या विचाराने अतिशय विनम्रपणे हे योगदान देत असल्याचं त्यांनी जाहीर केलं. मुख्यमंत्री म्हणून नाही, महाराष्ट्र सरकारच्या वतीने नाही तर ही देणगी ट्रस्टच्या वतीने देत असल्याचं त्यांनी सांगितलं. माझी ही तिसरी अयोध्या भेट असून प्रत्येक दौऱ्यानंतर आम्हाला यश मिळालं असंही त्यांनी सांगितलं.

शिवसेनेने अयोध्या आंदोलनात सहभाग घेतला होता. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही सक्रिय पाठिंबा दिला होता. त्यामुळे त्या सर्व आठवणी ताज्या झाल्या आहेत असंही त्यांनी सांगितलं. शिवसेनेने भाजपला सोडलं हिंदुत्वाला नाही असंही ते म्हणाले. यापुढेही मी अयोध्येत येत राहीन अशी घोषणाही त्यांनी केली.

दरम्यान,  केंद्र सरकारने अयोध्येत राम मंदिर बांधकामासाठी ट्रस्टची स्थापना केल्यानंतर कामाला वेग आलाय. ट्रस्टची दुसरी बैठक आज झाली त्यात महत्वाचा निर्णय घेण्यात आला. राम मंदिराच्या बांधकामाला लवकरच सुरुवात होणार असून त्यासाठी कामाला सुरुवात झालीय. याचाच एक भाग म्हणून राम जन्मभूमी स्थानावर सध्या ज्या मूर्ती आहेत त्या रामलल्लांचं स्थानांतर करण्यात येणार आहे. या मूर्ती तात्पुरत्या स्वरुपात नव्या जागेत स्थानांतरीत करण्यात येणार असल्याची माहिती ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी दिलीय.

हेही वाचा...

उद्धव ठाकरेंचं सरकार म्हणजे, ‘अंधेर नगरी, चौपट राजा’

मुलाने विचारलं आई तू का हरली? पंकजा मुंडेंनी दिलं हे उत्तर

First published: March 8, 2020, 2:26 PM IST

ताज्या बातम्या