लाव रे ते फटाके; उद्धव ठाकरेंचा राजना पहिल्यांदाच जोरदार टोला

लाव रे ते फटाके; उद्धव ठाकरेंचा राजना पहिल्यांदाच जोरदार टोला

उद्धव ठाकरे यांनी राज यांना जोरदार टोला लगावला आहे.

  • Share this:

मुंबई, 23 मे : देशासह राज्यात भाजपला मिळालेल्या यशानंतर सोशल मीडियावर राज ठाकरेंना ट्रोल केला जात आहे. त्यानंतर शिवसेना पक्ष प्रमुख राज ठाकरे यांनी देखील मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना 'लाव रे ते फटाके' म्हणत टोला हाणला आहे. लोकसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सत्ताधारी पक्षांवर टीकास्त्र डागलं होतं. शिवाय, त्यांचा 'लाव रे तो व्हिडीओ' हा डायलॉग देखील गाजला होता. प्रचारादरम्यान राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांची चांगलीच कोंडी केल्याचं चित्र पाहायाला मिळालं होतं.

राज ठाकरेंच्या सभांचा फायदा विरोधकांना होईल असा देखील एक अंदाज होता. पण, निकालामध्ये मात्र वेगळंच चित्र पाहायाला मिळालं. राज ठाकरेंनी घेतलेल्या सभांच्या ठिकाणी देखील विरोधकांना फायदा झाल्याचं आकडेवारीवरून दिसत नाही. निकाल लागल्यानंतर आता राज ठाकरेंना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं होतं. त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांनी देखील टोला लगावला आहे.

उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून उर्मिला मातोंडकरांचा दारूण पराभव

उद्धव ठाकरे – फडणवीसांची पत्रकार परिषद

लोकसभेत मिळालेल्या यशानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मातोश्रीवर जात उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले देखील होते. यावेळी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना उद्धव यांनी राजना टोला हाणला. दरम्यान, विधानसभेनंतर देखील शिवसेना भाजप युती कायम असेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

लोकसभा निवडणुकीच्या निकालावर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

निकालावर काय म्हणाले राज

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही लोकसभा निवडणूक 2019च्या निकालावर ट्विटरच्या माध्यमातून आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर 'अनाकलनीय !' असे लिहित निकालाबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

VIDEO : विजयानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 23, 2019 06:00 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading