नालेसफाई ही कधीच पूर्णपणे होऊ शकत नाही -उद्धव ठाकरे

नालेसफाई ही कधीच पूर्णपणे होऊ शकत नाही -उद्धव ठाकरे

"नालेसफाई कधीच पूर्ण होत नसते. नालेसफाई पावसाच्या आधी आणि पावसाच्या नंतरही सुरूच असते. त्यामुळे नालेसफाई पूर्ण हा शब्द प्रयोग चुकीचा आहे"

  • Share this:

09 मे : नालेसफाई कधीच पूर्ण होत नसते. नालेसफाई पावसाच्या आधी आणि पावसाच्या नंतरही सुरूच असते. त्यामुळे नालेसफाई पूर्ण हा शब्द प्रयोग चुकीचा आहे असं वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलंय.  तसंच  पाणी तुंबू नये हे महत्वाचं आहे त्यामुळे पावसाळ्यापूर्वी नालेसफाईचं काम पूर्ण होईल अशी ग्वाहीही उद्धव ठाकरेंनी दिली.

पावसाळा आता महिन्याभर येऊन ठेपला आहे. दरवर्षीप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी आज नालेसफाईची पाहणी केली. या पाहणीदौऱ्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मीडियाच्या प्रतिनिधींशी संवाद साधला.

जवळपास गेली वर्षे मी नालेसफाईची पहाणी मी करतोय. दरवेळा मला प्रश्नं विचारला जातो की, निवडणुकीच्या तोंडावर नालेसफाई ची पाहणी करता का?, आता निवडणुका तर होऊन गेलेल्या आहेत. माझं कर्तव्य म्हणून मी ही पाहणी करतोय. ही पाहणी करताना अनेक ठिकाणी सुधारणा झालेल्या आहेत. नाल्यांचं रुंदीकरण झालेलं आहे. याही वर्षी नालेसफाईचं काम सुरू आहे. किती टक्के सफाई झाली या प्रश्नात मला इंटरेस्ट नाही. मुळात पाणी तुंबू न देणे याकडे महापालिकेचं लक्ष आहे. गेल्या वर्षी पाणी तुंबले नाही. यावेळी ही माहापालिका दक्ष आहे. कुठे ही पाणी तुंबणाऱ्या नाही याची दक्षता महापालिका घेणार आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले.

तसंच  नालेसफाई कधीच पूर्ण होत नसते. नालेसफाई पावसाच्या आधी पावसाच्या नंतर आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा ही नालेसफाई सुरूच असते. त्यामुळे नालेसफाई पूर्ण झाली हा शब्द प्रयोग चुकीचा आहे. ही सातत्याने चालू असणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे पावसाच्या पूर्वी जी कामं करायची आहेत तू पूर्ण केली जातील असं आश्वासन उद्धव ठाकरेंनी दिलं.

नालेसफाईत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप निवडणुकीच्या वेळी प्रचारात केला गेला. पण, भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झाले नाही.केवळ निवडणुकीपुरते हे आरोप झाले. आता यावर कुणाला काय लिहायचं ते लिहू द्या. आणखी काही लिहायचं असेल तर कागद पुरवा असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी आशिष शेलार यांचं नाव न घेता टोला लगावला.

First published: May 9, 2017, 7:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading