ठाकरे कुटुंबातला भावनिक क्षण; राज यांच्या आईंना अश्रू अनावर, उद्धव ठाकरेही झाले भावूक

ठाकरे कुटुंबातला भावनिक क्षण; राज यांच्या आईंना अश्रू अनावर, उद्धव ठाकरेही झाले भावूक

मी उद्धव बाळासाहेब ठाकरे...असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी राज्याचे 29 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

  • Share this:

मुंबई, 28 नोव्हेंबर : मी उद्धव बाळासाहेब ठाकरे...असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी राज्याचे 29 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला ठाकरे कुटुंबाचा भावनिक क्षण पाहण्यास मिळाला. राज यांच्या आई जेव्हा उद्धव यांना भेटल्या तेव्हा त्यांना अश्रू अनावर झाले.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला संपूर्ण ठाकरे कुटुंब हजर होतं. ठाकरे घराण्यासाठी आजचा दिवस हा अत्यंत भावनिक आणि महत्त्वाचा असाच होता. ठाकरे घराण्यातून पहिल्यांदाच मुख्यमंत्री म्हणून उद्धव यांनी शपथ घेतली.  राज ठाकरे सहकुटुंब या सोहळ्यासाठी हजर होते. उद्धव यांनी शपथ घेतल्यानंतर सर्व दिग्गज मान्यवरांनी त्यांचं व्यासपीठावर अभिनंदन केलं. यावेळी राज यांनी हस्तांदोलन करून उद्धव यांचं अभिनंदन केलं. त्यानंतर राज यांच्या आई  कुंदाताई ठाकरे जेव्हा उद्धव यांना भेटल्या तेव्हा  त्यांना अश्रू अनावर झाले. उद्धव ठाकरेही यावेळी भावूक झाले होते.  अत्यंत भावनिक असा हा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला. ठाकरे कुटुंबातील हा जिव्हाळा पाहून  उपस्थितीत ही गहिवरले होते.

विशेष म्हणजे, शिवाजी पार्क आणि ठाकरे यांचं एक वेगळं महत्त्व आहे. शिवसेनेचा प्रत्येक दसरा मेळावा हा शिवतीर्थावर होतं असतो. शिवतीर्थावरच बाळासाहेबांचं स्मृतीस्थळही उभारण्यात आलं आहे. बाळासाहेबांच्या स्मृती दिनी राज आणि उद्धव ठाकरे हे शिवतीर्थावर एकत्र आले होते. मध्यंतरी अमित ठाकरे यांच्या लग्नसोहळ्याला संपूर्ण ठाकरे कुटुंब एकत्र होतं.

या शपथविधी सोहळ्याला रिलायन्स समुहाचे चेअरमन मुकेश अंबानी सह कुटुंब हजर आहे. या सोहळ्याला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही हजर आहे. तसंच मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत, कपिल सिब्बल यांच्यासह अनेक दिग्गज नेते हजर होते.

उद्धव ठाकरे यांनी शिवाजी महाराजांना आणि आई वडिलांना स्मरून शपथ घेतली. शिवसेनेच्या वतीने उद्धव ठाकरे यांच्यानंतर एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, राष्ट्रवादीच्या वतीने जयंत पाटील, छगन भुजबळ, काँग्रेसच्या वतीने बाळासाहेब थोरात, नितीन राऊत यांनी शपथ घेतली. आघाडीत असलेल्या सर्व पक्षांच्या प्रत्येकी दोन जणांनी शपथ घेतली. शपथविधीनंतर राष्ट्रगीताने सोहळ्याची सांगता झाली.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  आणि चंद्रकांत पाटील हे या शपधविधी समारंभाला उपस्थित होते. त्याचबरोबर या कार्यक्रमाला देशभरातले दिग्गज नेते उपस्थित होते. काँग्रेसचे नेते अहमद पटेल, मल्लिकार्जुन खर्गे, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ, कपील सिब्बल, एम. के स्टॅलीन, शंकरसिंह वाघेला. यांच्यासह अनेक दिग्गज उपस्थित होते. राज ठाकरे हे सहकुटूंब या शपथविधी कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांची उपस्थिती हा चर्चेचा विषय ठरली. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे व्यासपीठावर बसले होते. त्यांच्या एका बाजूला धनंजय मुंडे तर दुसऱ्या बाजुला सुनील तटकरे होते.

हा आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मुख्य अजेंडा

शेतकरी, शेतमजूर, व्यापारी, लघू मध्यम आणि मोटे उद्योग, शिक्षण, आरोग्य आणि रोजगार, सर्व जाती धर्म आणि प्रादेशिक विभाग, SC, ST, OBC धार्मिक आणि अल्पसंख्यांक सामाजिक गट

कर्ज आणि दुष्काळाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांना सरसरकट कर्जमाफी

शेतकऱ्यांना तात्काळ कर्ज उपलब्ध व्हावं यासाठी मदत करणार

शेतकऱ्यांना तातडीने विमा मिळवून देणार

कृषीमालाच्या योग्य भाव देण्याची हमी देणार

गरिबांना शिक्षणा साठी 0% व्याजाने ने कर्ज देणार

रोजगारामध्ये स्थानिकांना 80 टक्के प्राधान्य

मुलींना मोफत शिक्षण आणि महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य

सामान्य नागरिकांसाठी 10 रुपयांमध्ये थाळी

500 फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता करात सुट

दुष्काळासाठी दीर्घकालीन उपययोजना करणार

सर्व कार्यक्रम घटनेतल्या तत्वांना आणि धर्मनिरपेक्षतेला धरून असेल

Published by: sachin Salve
First published: November 28, 2019, 7:41 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading