...म्हणून संजय राऊत शपथविधी सोहळ्यातून बाहेर पडले!

...म्हणून संजय राऊत शपथविधी सोहळ्यातून बाहेर पडले!

महाआघाडीचे शिलेदार आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे आज शपथविधीचा कार्यक्रम पूर्णपणे पाहू शकले नाहीत.

  • Share this:

मुंबई, 28 नोव्हेंबर :  महाआघाडीचे शिलेदार आणि शिवसेनेचे खासदार  संजय राऊत हे आज  शपथविधीचा  कार्यक्रम पूर्णपणे पाहू शकले नाहीत. ज्या महत्वाच्या घटनेसाठी आणि शिवसेनेच्या मुख्यमंत्रिपदासाठी त्यांनी जीवाचे रान केले तो कार्यक्रम अर्धवट सोडून त्यांना बाहेर पडावं लागलं.

प्रचंड गर्दी आणि  गराड्यात  झालेल्या धक्काबुक्कीने राऊत यांना अस्वस्थ वाटू लागल्यानं त्यांना आराम करण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात आराम करायला नेण्यात आलं. तिथं रणजीत सावरकर यांनी त्यांची काळजी घेतली. काही दिवसांपूर्वीच त्यांच्यावर अँजिओग्राफी करण्यात आली होती. त्यानंतरही त्यांनी आराम करण्याऐवजी आपली मुलूख मैदान तोफ धडाधडत ठेवलेली पाह्यला मिळाली. आज शपथविधीच्या सोहळ्यातही संज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पहिली पत्रकार परिषद

दरम्यान, शिवाजी पार्कवर झालेल्या शपथविधी सोहळ्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाची पहिली कॅबिनेट बैठक झाली. या बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांनी मंत्र्यांसह पहिली पत्रकार परिषद घेतली. या पत्रकर परिषदेत कॅबिनेटमधील निर्णयांची महिती दिली. तसेच आगामी काळात राज्य सरकार कसे काम करेल याची माहिती दिली.

छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी रायगड किल्ल्यासाठी 20 कोटी मंजूर केल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. राज्यातील हे सरकार सर्व सामान्य माणसाचे सरकार असेल. राज्यात कोणालाही दहशत वाटणार नाही, असे ही ठाकरे यांनी सांगितलं.

आतापर्यंत शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारकडून कोणती आणि किती मदत झाली याची माहिती घेण्याचे आदेश मुख्य सचिवांना दिले असून ही माहिती मिळाल्यानंतर शेतकऱ्यांना मोठी मदत करणार असल्याचे त्यांनी सांगितलं.

महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमात वारेमाप घोषणा असल्या तरी मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र या विकासाच्या वाटचालीत वर्षानुवर्षे मागे राहिलेल्या क्षेत्राचा साधा नामोल्लेख सुद्धा असू नये, अशी टीका नव्या सरकारवर देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. यासंदर्भात प्रश्न विचारले असता मुख्यमंत्र्यांनी राज्याचे मंत्रिमंडळ कोणाचे असते याचा त्यांनी अभ्यास करून यावा असे उत्तर दिले. दरम्यान उद्धव ठाकरे उद्या दुपारी एक वाजता मंत्रालयात जाऊन पदभार स्विकारणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 28, 2019 10:52 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading