...आणि शिवतीर्थावर एकत्र आले उद्धव आणि राज ठाकरे!

...आणि शिवतीर्थावर एकत्र आले उद्धव आणि राज ठाकरे!

ठाकरे घराण्यातून पहिले मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. 'मी उद्धव बाळासाहेब ठाकरे...'असं म्हणताच शिवतीर्थावर शिवसैनिकांनी एकच जल्लोष केला

  • Share this:

मुंबई, 28 नोव्हेंबर : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला त्यांचे चुलत भाऊ आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे पोहोचले आहे.

ठाकरे घराण्यातून पहिले मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. 'मी उद्धव बाळासाहेब ठाकरे...'असं म्हणताच शिवतीर्थावर शिवसैनिकांनी एकच जल्लोष केला. शपथ घेतल्यानंतर उद्धव हे शिवसैनिकांपुढे नतमस्तक झाले. या शपथविधी सोहळ्याला ठाकरे कुटुंब एकत्र आलं आहे. राज ठाकरे या शपथविधी सोहळ्याला हजर आहे. राज यांना व्यासपीठावर स्थान देण्यात आलं आहे. व्यासपीठावर पोहोचल्यानंतर राज यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते, राष्ट्रवादीचे नेते आणि इतर दिग्गजांची भेट घेतली.

शिवतीर्थ आणि ठाकरे यांचं एक वेगळं महत्त्व आहे. शिवसेनेचा प्रत्येक दसरा मेळावा हा शिवतीर्थावर होतं असतो. शिवतीर्थावरच बाळासाहेबांचं स्मृतीस्थळही उभारण्यात आलं आहे. बाळासाहेबांच्या स्मृती दिनी राज आणि उद्धव ठाकरे हे शिवतीर्थावर एकत्र आले होते. मध्यंतरी अमित ठाकरे यांच्या लग्नसोहळ्याला संपूर्ण ठाकरे कुटुंब एकत्र होतं.

या शपथविधी सोहळ्याला रिलायन्स समुहाचे चेअरमन मुकेश अंबानी सह कुटुंब हजर आहे. या सोहळ्याला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही हजर आहे. तसंच मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत, कपिल सिब्बल यांच्यासह अनेक दिग्गज नेते हजर होते.

उद्धव ठाकरे यांच्या मंचावर 'बळीराजा'स मान

शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा म्हणून 85 किलोमीटर अनवाणी चालत विठुरायाला साकडे घालणाऱ्या शिवसैनिकाची इच्छा अखेर पूर्ण झाली. शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि राज्याचे भावी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या दाम्पत्याचा सन्मान करण्यासाठी खास निमंत्रण दिले आहे. यासोबतच शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबासह सुमारे राज्यातील 400 शेतकऱ्यांना निमंत्रण देण्यात आले आहे.

सांगलीच्या जत तालुक्यातील बनाळी येथील शिवसैनिक संजय सावंत आणि त्यांच्या पत्नी रूपाली सावंत हे दोघे बनाळीपासून पंढरपूरपर्यंत अनवाणी चालत आले होते. यासाठी त्यांना तीन दिवसांचा कालावधी लागला होता. पंढरपुरात येऊन त्यांनी विठ्ठलास साकडे घातले की, 'मुख्यमंत्री शिवसेनेचा व्हावा'.यानंतर त्यांनी चंद्रभागा पाण्याने भरलेला कलश आणि तुळशी अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करण्यासाठी आलेल्या उद्धव ठाकरे यांना भेट दिली.

24 तासांत उभारले 6000 चौरस मीटरचे व्यासपीठ...

उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीसाठी राज्याभिषेकासारखी सोहळ्याची तयारी करण्यात आली. या सोहळ्यासाठी कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई भव्य व्यासपीठ उभारला. 24 तासांत 60 हजार चौरस मीटरचे व्यासपीठ उभारले. बाळासाहेब ठाकरे स्मृतिस्थळाच्या बाजूला व्यासपीठामागे शिवरायांचा पुतळा आणि समोर शिवराज्याभिषेकाचे शिल्प असणार आहे. महाराष्ट्राची भव्यता आणि इतिहास या मंचाद्वारे मांडला जाईल. मंचावर 100 जणांच्या बसण्याची सोय असेल. 30 हजार खुर्च्या टाकण्यात येणार आहेत. या कार्यक्रमासाठी सुमारे 1 लाख लोक येथील अशी अपेक्षा आहे. तसंच 20 ते 25 भव्य एलईडी स्क्रीनही असतील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 28, 2019 07:02 PM IST

ताज्या बातम्या