Home /News /mumbai /

उद्धव ठाकरेंनी मोठी संधी गमावली, पृथ्वीराज चव्हाणांची थेट टीका

उद्धव ठाकरेंनी मोठी संधी गमावली, पृथ्वीराज चव्हाणांची थेट टीका

 उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्ह करून राजीनामा देण्याची घोषणा केली होती. त्यांच्या या निर्णयावर काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी टीका केली

उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्ह करून राजीनामा देण्याची घोषणा केली होती. त्यांच्या या निर्णयावर काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी टीका केली

उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्ह करून राजीनामा देण्याची घोषणा केली होती. त्यांच्या या निर्णयावर काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी टीका केली

    मुंबई, ३० जून : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा (uddhav thackeray resigns as cm) दिल्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले आहे. पण, उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्ह न करता सभागृहात येऊन बोलले पाहिजे होते. त्यांनी लढण्याची ताकदच ठेवली नाही, अशी टीका काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी केली आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्ह करून राजीनामा देण्याची घोषणा केली होती. त्यांच्या या निर्णयावर काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी टीका केली आहे. 'सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय होता, तो संभ्रम अवस्थेत आहे.पक्षांतर बंदी कायदा, बहुमत चाचणी याबद्दल न्यायालयाने स्पष्ट असा निकाल दिला नाही. मुळात उद्धव ठाकरे यांनी अधिवेशनामध्ये यायला पाहिजे होते. त्यांनी आपली बाजू मांडायला हवी होती. अधिवेशनात भाषण करून राजीनामा दिला असता तरी चालले असते. पण त्यांनी अधिवेशनात संधी गमावली आहे. सभागृहामध्ये महाविकास आघाडी सरकार का स्थापन झाले याबद्दल बोलताही आले असते. विरोधी पक्षालाही बोलता आले असते. पण उद्धव ठाकरे यांनी लढण्याची ताकदच ठेवली नाही. एकदा सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला तर विषय वेगळा होता' अशी टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. 'त्यांनी फेसबुक लाईव्ह करायला नको हवे होते. सभागृहामध्ये जर बोलले असते तर त्यांचं भाषण हे रेकॉर्डवर राहिलं असतं. महाराष्ट्रातील जनतेनंही ऐकलं असतं' असंही चव्हाण म्ङणाले. 'खरं म्हणजे, एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं. बाळासाहेब ठाकरे यांनी मनोहर जोशी यांना मुख्यमंत्री केलं होतं. तसं घडेल अशी अपेक्षा त्यांना होती. संधी मिळेल तर आपल्याला मिळेल अशी एकनाथ शिंदेंना होती. पण शरद पवार यांनी सर्व व्यवस्था केली होती. जर आदित्य ठाकरे यांचं नाव आलं असतं तर कमी वयाच्या व्यक्तिच्या हाताखाली काम करण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे त्यांनी उद्धव ठाकरे यांनाच मुख्यमंत्री होण्यास सांगितले, असा खुलासाही पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या