• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • विधान परिषद निवडणुकीत उद्धव ठाकरेंसमोर येऊ शकते 'ही' अडचण, भाजपची अशी आहे खेळी?

विधान परिषद निवडणुकीत उद्धव ठाकरेंसमोर येऊ शकते 'ही' अडचण, भाजपची अशी आहे खेळी?

मे महिन्यात विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाले आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निवडून जाण्याच्या तयारीत आहेत

  • Share this:
मुंबई, 02 मे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीचा मार्ग मोकळा झाला आहे. लवकरच विधान परिषदेच्या निवडणूक घेण्यात येणार आहे पण जरी निवडणुका होणार असेल तरी ही निवडणूक बिनविरोध करण्याचं आव्हान  सगळ्यांसमोर आहे. मे महिन्यात विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाले आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निवडून जाण्याच्या तयारीत आहेत. त्यासाठी महाविकास आघाडीने बराच खटाटोप केला. पण आता नऊ जागांसाठी महाविकास आघाडी 6 उमेदवार देणार, अशी माहिती कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. तर दुसरीकडे 4 जागा भाजप आमदारांच्या संख्याबळावर जिंकेल, असा दावा भाजपचा आहे. हेही वाचा - नवी मुंबईत परप्रांतीय मजुरांची मोठी गर्दी, सोशल डिस्टन्सिंगचा पुन्हा फज्जा त्यामुळे महाविकास आघाडीचे सहा आणि भाजप आणि चार उमेदवार उभे केले तर नऊ जागांसाठी दहा उमेदवार असतील. त्यामुळे विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होण्याचं अवघड आहे. वास्तविक महाविकास आघाडी संख्याबळानुसार पाच जागा सहज जिंकतात. फक्त एका जागेसाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांना मतांची जुळवाजुळव करावी लागणार आहे त्या तुलनेनं भाजपच्या जवळ असलेल्या संख्याबळानुसार, भाजपाचे अपक्षांचा पाठिंबा लक्षात घेत चौथा उमेदवार यासाठी अवघ्या चार ते पाच मतांची अधिक गरज लागत आहे. हेही वाचा - शासनाच्या खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची लूट, कापसाची कमी भावाने खरेदी त्यामुळे भाजप कोणत्याही परिस्थितीत 14 उमेदवार देण्याच्या तयारीत असल्याचे समजत आहे. जर तसं झालं तर मात्र, नऊ जागांच्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत दहा उमेदवार असं चित्र निर्माण होईल आणि त्यामुळे निवडणूक बिनविरोध होणे कठीण आहे. परंतु, जर महाविकास आघाडीमधील काही नेते तसंच भाजपतील काही नेते एकमेकांशी संपर्क करून निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्नदेखील करतील. असं जर झालं तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होईल. पण  तुर्तास तरी महाविकास आघाडी आणि भाजप दोन्ही एकमेकांवर दबावतंत्राचा वापर करत आहे.  संपादन - सचिन साळवे
Published by:sachin Salve
First published: