नवं सरकार देणार रोजगाराची संधी, असा आहे ठाकरे सरकारचा अजेंडा!

नवं सरकार देणार रोजगाराची संधी, असा आहे ठाकरे सरकारचा अजेंडा!

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देणार असं आश्वासन शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने निवडणुकीत दिलं होतं. मात्र या कार्यक्रम पत्रिकेत संपूर्ण कर्जमाफी असा उल्लेख नसल्याने त्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला मात्र त्याला थेट उत्तर दिलं गेलं नाही.

  • Share this:

मुंबई 28 नोव्हेंबर : महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे शपथ घेणार आहेत. त्या आधी काही तास आधी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन किमान समान कार्यक्रम घोषीत केला. तीन वेगवेगळ्या विचारांचे पक्ष सरकारबनविण्यासाठी एकत्र आल्याने त्यांनी तीनही पक्षांच्या जाहीरनाम्यातले काही मुद्दे एकत्र करत हा किमान समान कार्यक्रम तयार केला आहे. उद्धव ठाकरे सरकारचा तो मुख्य अजेंडा राहणार असून सर्वांच्या विकासासाठी हे सरकार काम करेल असंही या नेत्यांनी सांगितलं. सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन काम करणार.  हा असेल मुख्य फोकस - शेतकरी, शेतमजूर, व्यापारी, लघू मध्यम आणि मोटे उद्योग, शिक्षण, आरोग्य आणि रोजगार, सर्व जाती धर्म आणि प्रादेशिक विभाग, SC, ST, OBC धार्मिक आणि अल्पसंख्यांक सामाजिक गट यांना सोबत घेऊन काम करणार.

काँग्रेसच्या दोन दिग्गज चव्हाणांची नावं पडली मागे, हे आहे त्याचं कारण

किमान समान कार्यक्रमातले मुख्य मुद्दे

कर्ज आणि दुष्काळाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांना  कर्जमाफी.

शेतकऱ्यांना तात्काळ कर्ज उपलब्ध व्हावं यासाठी मदत करणार.

शेतकऱ्यांना तातडीने विमा मिळवून देणार.

कृषीमालाच्या योग्य भाव देण्याची हमी देणाक.

गरिबांना शिक्षणा साठी 0% व्याजाने ने कर्ज देणार.

रोजगारामध्ये स्थानिकांना 80 टक्के प्राधान्य.

मुलींना मोफत शिक्षण आणि महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य.

सामान्य नागरिकांसाठी 10 रुपयांमध्ये थाळी.

500 फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता करात सुट.

दुष्काळासाठी दीर्घकालीन उपययोजना करणार.

सर्व कार्यक्रम घटनेतल्या तत्वांना आणि धर्मनिरपेक्षतेला धरून असेल.

'आदर्श'मुळे अशोक चव्हाणांचा पत्ता कट, काँग्रेसचे हे दोन नेते घेणार शपथ

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देणार असं आश्वासन शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने निवडणुकीत दिलं होतं. मात्र या कार्यक्रम पत्रिकेत संपूर्ण कर्जमाफी असा उल्लेख नसल्याने त्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला मात्र त्याला थेट उत्तर दिलं गेलं नाही.

नाराज असल्याच्या प्रकरणावर अजित पवार काय म्हणाले?

अजित पवार म्हणाले, आज सर्वच पक्षांचे दोन दोन नेते मंत्रिपदाची शपथ घेतील. मी आज शपध घेणार नाही. मंत्र्यांची नावं ही कळविण्यात आली आहेत. मंत्रिमंडळाचा विस्तार हा विश्वास दर्शक ठरावानंतर होईल. आज पक्षाने जयंत पाटील आणि छगन भुजबळ यांना शपथ घेण्याचा आदेश दिला असं ते म्हणाले. मी नाराज नाही. शपथविधीला जाणार आहे. सुप्रिया सुळेंना सोबत घेऊन मी शपधविधीला जाणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. मी नाराज नाही, पक्ष जो निर्णय घेईल तो सगळ्यांना मान्य असेल असंही ते म्हणाले. मी बंड केलं नव्हतं. मी एक भूमिका घेतली होती. त्याबद्दल मी योग्य वेळी खुलासा करेन. त्याबद्दल केव्हा बोलावं हा माझा अधिकार आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: November 28, 2019, 4:54 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading