हा कद्रूपणा सोडा आणि..., उद्धव ठाकरेंनी दिली फडणवीसांना ऑफर

हा कद्रूपणा सोडा आणि..., उद्धव ठाकरेंनी दिली फडणवीसांना ऑफर

'जो काही वाद चालला आहे, तो राज्याच्या हिताचा नाही. आमचे प्रकल्प तुम्ही आडवायचे, तुमचे प्रकल्प आम्ही आडवायचे हे चांगले नाही'

  • Share this:

मुंबई, 20 डिसेंबर : मुंबईतील कांजूरमार्ग मेट्रो कारशेडच्या (metro car shed kanjurmarg) मुद्यावरून शिवसेना (shivsena) आणि भाजपमध्ये वाद पेटला आहे. या वादावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackery) यांनी भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनाच ऑफर दिली आहे. 'तुम्हाला श्रेय हवे असेल तर खुशाला घ्या पण हा माझ्या आणि तुमच्या इगोचा प्रश्न नाही. प्रकल्प अडवण्याचा कद्रूपणा सोडून चर्चा करून मार्ग काढूया' असं आवाहनच मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरे येथील मेट्रो कारशेड कांजूरमार्गला हलवला. परंतु, भाजप नेत्यांनी कांजूरमार्गची जागा केंद्राची असल्याचे सांगितले. एवढंच नाहीतर हायकोर्टानेही कांजूरमार्ग येथील काम थांबवण्याचे आदेश दिले आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वादावर तोडगा काढण्यासाठी विरोधकांना आवाहन केले आहे.

'जो काही वाद चालला आहे, तो राज्याच्या हिताचा नाही. आमचे प्रकल्प तुम्ही आडवायचे, तुमचे प्रकल्प आम्ही आडवायचे हे चांगले नाही. पाच वर्ष असंच करत बसलो तर जनतेला सांगायला काहीच उरणार नाही. मुळात हा कद्रूपणा सोडला पाहिजे. माझं विरोधी पक्षाला आवाहन आहे की, कारशेडच्या प्रकल्पाचे श्रेय तुम्हाला द्यायला तयार आहोत. कांजूरमार्गमध्ये केंद्राने हस्तक्षेप केला आहे. मध्ये कुणी तरी बिल्डर सुद्धा असेल, पण आपण चर्चा केली तर प्रश्न सुटू शकतो. तुम्हाला मी श्रेय देतो, इथं माझ्या इगोचा विषय नाही आणि तुमच्याही इगोचा प्रश्न असता कामा नये. जनतेच्या सेवेसाठी आपण काम करत असतो. त्यामुळे सर्वांनी याचा विचार करावा, असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं.

'होय, मी अहंकारी'

'मी मुंबईसाठी अहंकारी आहे, महाराष्ट्राच्या हितासाठी अहंकारी आहे.  आरे कारशेडची जागा मेट्रो 3 साठी होती. त्यामध्ये आरे कारशेडमध्ये 30 हेक्टर जागा प्रस्तावित होती. त्या 30 हेक्टरमध्ये ती जागा वापरणार नाही, असं लिखित दिले आहे. आता ती जागा वापरणार नाही तर या प्रकल्पामध्ये घेतली कशाला?  ज्या मेट्रोचे काम 3 वर्षांमध्ये पूर्ण होणार आहे. त्यासाठी आणखी जागा लागली तर इतर जागा घेतली जाईल. फक्त एकाच लाईनासाठी कारडेपो का करायचा?'असा सवाल मुख्यमंत्र्यांनी विचारला.

'स्टर्लिंग लाईनचा उल्लेख का टाळला'

'मेट्रोचा मार्ग हा ठरलेला आहे. त्याच्यावर सकाळ आणि संध्याकाळचा वेळी कमी जास्त गर्दी असणार आहे. त्यानुसार मेट्रोच्या फेऱ्या वाढवल्या जातात. आता ज्या मेट्रो गाड्या थांबणार आहे, त्यासाठी जागा करावी लागते. पण, पहिल्या प्रकल्पामध्ये मेट्रो उभ्या करण्यासाठी लागणारी  स्टर्लिंग लाईनचा उल्लेखच नव्हता. या स्टर्लिंग लाईन आरेच्या टोकावरती करण्यात येणार होता', असा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला आहे.

जे आम्ही करतोय तो अहंकार आहे की उपयोग?

'आरेमध्ये पर्यावरण वाचवले. त्याची व्यापती वाढली असून 800 एकर जागा झाली आहे. कांजूरमार्गमध्ये 40 हेक्टर जागा आहे. तर आरेमध्ये 25 हेक्टर जागा वापरणार होतो, पण कांजूरमार्गमध्ये संपूर्ण जागा ही ओसाड आहे. त्यामुळे आरेच्या जागेवर मेट्रो 3 चा कारशेड होणार होता. पण कांजूरमार्गावर 40 हेक्टर जागा असल्यामुळे मेट्रो 3, 4 आणि 6 या तिन्ही लाईनच्या कारशेड उभारू शकतो. त्यामुळे तिन्ही लाईनचे कारशेड एकाच ठिकाणी उभारू शकतो. याच कारशेडमधून मेट्रो 14 थेट अंबरनाथपर्यंत लाईन नेता येईल. जर विकास करायचा असेल तर हा योग्य नाही का? मग तुम्ही सांगा मला, जे आम्ही करतोय तो अहंकार आहे की उपयोग आहे? असा थेट सवाल मुख्यमंत्र्यांनी जनतेला विचारला आहे.

'मी राज्याचा मुख्यमंत्री आहे म्हणून जनतेसाठी हे काम करणारच आहे. यात चूक काय आहे. काय मी चूक करत आहे. पण, दुर्दैवाने केंद्र सरकार हायकोर्टात गेले आहे. जर खेचाखेची करायची आहे. तर बुलेट ट्रेनसाठी जगातला सर्वात महागडा भुखंड वांद्रे येथील दिला आहे. त्याच्यावर फायनान्स सेंटर हे इतर राज्यात गेला आम्ही विरोध केला नाही. परंतु, ज्या ज्या वेळी केंद्राचे इतर प्रकल्प राज्यात येतात तेव्हा जमीन दिली जाते. मग मेट्रोच्या प्रकल्पाचा वाद आपण का सोडवू शकत नाही. काही बिल्डर तिकडे गेले आहे. जर केंद्र आणि राज्याने बसून यावर तोडगा काढला पाहिजे' असंही मुख्यमंत्री म्हणाले.

'रात्रीची संचारबंदी लागणार नाही'

'काही जणांनी रात्रीची संचारबंदी लागू करण्याचे सूचवले आहे. काही जणांनी पुन्हा लॉकडाउन लागू करण्याचे सांगितले आहे. पण मला वाटत नाही की, रात्रीची संचारबंदी आणि लॉकडाउन पुन्हा लागू करण्याची गरज नाही' अशा स्पष्ट शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रात्रीची संचारबंदी लागू करण्यास नकार दिला आहे.

Published by: sachin Salve
First published: December 20, 2020, 2:55 PM IST
Tags:

ताज्या बातम्या