Home /News /mumbai /

Uddhav thackeray live : गाढवाला आम्ही सोडून दिलं, उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला

Uddhav thackeray live : गाढवाला आम्ही सोडून दिलं, उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला

आम्ही अडीच वर्षांपूर्वीच गाढवाला सोडून दिलं. त्यामुळे तुम्हाला गैरसमज झाला असेल,

आम्ही अडीच वर्षांपूर्वीच गाढवाला सोडून दिलं. त्यामुळे तुम्हाला गैरसमज झाला असेल,

आम्ही अडीच वर्षांपूर्वीच गाढवाला सोडून दिलं. त्यामुळे तुम्हाला गैरसमज झाला असेल,

    मुंबई, 14 मे : अहो गदा पेलायला सुद्धा हातामध्ये ताकद पाहिजे. हनुमान, भीम! त्यामध्ये आपले देवेंद्र फडणवीस बोलले, अहो यांचं हिंदुत्व हे घंटाधारी नाही, गदाधारी आहे. म्हटलं बरोबर आहे. आमचं हिदुत्व हे गदाधारी होतं. पण ते अडीच वर्षांपूर्वी सोडलं. आमचे जे काही जुने फोटो तुमच्यासोबत येत आहेत त्याने तुमचा गैरसमज झाला असेल.आम्ही अडीच वर्षांपूर्वीच गाढवाला सोडून दिलं. त्यामुळे तुम्हाला गैरसमज झाला असेल,  असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackery) यांनी फडणवीसांना (devendra fadanvis) टोला लगावला. मुंबईतील बिकेसी मैदानावर शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विराट सभा पार पडली. या सभेत बोलत असताना उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. 'तुमच्या प्रमाणे मलाही जरा मोकळं वाटतं आहे. बऱ्याचदिवसांनी मैदानावर उतरलो आहे. मोकळा श्वास घेतो आहे. अनेक विषयांवर बोलायचं आहेच. पण आज सर्वप्रथन छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन करतो. छत्रपती संभाजी महाराज म्हटल्यावर आणखी काही बोलायची गरज नाही. पण काही वेळेला ज्यांना महाराष्ट्र काय आहे हे महाराष्ट्रात राहून ओळखता आलेलं नाही त्यांच्यासाठी बोलावं लागतं. विषय म्हटले तर बरेच आहेत. नेमकं कशावर बोलायचं हा मुद्दा असला तरी हल्ली विशेषत: सर्व पक्ष त्यातही हिंदुत्वाचा खोटा बुर्खा घातलेला एक पक्ष आपल्यासोबत होता ते देशाची दिशा भरकवटत आहेत,असं म्हणत उद्धव ठाकरेंनी घणाघाती भाषणाला सुरुवात केली. (Uddhav thackeray :..तर हा महाराष्ट्र जो पेटेल, उद्धव ठाकरेंचा भाजपला इशारा) 'मला आज मोठी गदा दिली. मी मध्ये एकदा बोललो होतो. आमचं हिंदूत्व कसं आहे ते शिवसेनाप्रमुखांनी शिकवलं आहे. मला देवळात घंटा बडवणारा हिंदू नको तर अतिरेक्यांना बडवणारा हिंदू हवा आहे. तोच धागा घेऊन आपण पुढे जात आहोत. आमचं हिंदूत्व हे गदाधारी आणि बाकीच्यांचं हिदूत्व हे गदाधारी आहे. बसा बडवत. काय मिळालं? घंटा! हे बघा तो गदा हलवतोय. हिंदुत्व हे घंटाधारी नाही, गदाधारी आहे. म्हटलं बरोबर आहे. आमचं हिदुत्व हे गदाधारी होतं. पण ते अडीच वर्षांपूर्वी सोडलं. आमचे जे काही जुने फोटो तुमच्यासोबत येत आहेत त्याने तुमचा गैरसमज झाला असेल.आम्ही अडीच वर्षांपूर्वीच गाढवाला सोडून दिलं. त्यामुळे तुम्हाला गैरसमज झाला असेल,  असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना टोला लगावला.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या