Home /News /mumbai /

'जनतेला समजावू शकतो पण करोनाला समजावू शकत नाही'; मुख्यमंत्र्यांनी दिले मोठ्या Lockdown चे संकेत

'जनतेला समजावू शकतो पण करोनाला समजावू शकत नाही'; मुख्यमंत्र्यांनी दिले मोठ्या Lockdown चे संकेत

Maharashtra Lockdown updates: महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग पाहता आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत एक महत्त्वाची बैठक पार पडली.

मुंबई, 10 एप्रिल: महाराष्ट्रात कोरोनाचा (Coronavirus) वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे महत्त्वाची बैठक पार पडली. कोरोना विषाणूची साखळी तोडायची असेल तर सलग 10 किंवा 21 दिवसांचा कडक लॉकडाऊन लावण्याच्या प्रस्तावावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चर्चा केली. या बैठकीत कडक लॉकडाऊन लावण्याचे संकेत दिले आहेत. 'जनतेला समजावू शकतो पण करोनाला समजावू शकत नाही'असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. थोडा वेळ सर्वांना कळ सोसावी लागेल बैठकीच्या शेवटी आपला निर्णय काय... कडक लॉकडाऊन पण जनतेचा उद्रेक यामध्ये मार्ग काढावा लागेल. थोडा वेळ सर्वांना कळ सोसावी लागेल. जनतेला समजावू शकतो पण करोनाला समजावू शकत नाही. मी ज्या सर्वांशी चर्चा केली त्यांना सर्वांनी सहकार्य केलं व्यापारी उद्योजक. याला काही अवधी लागेल एक दोन दिवसात व्यापारांचा प्रश्नं सोडवू. नाहीतर सर्व काही सुरू ठेवा आणि जे काही अनर्थ ओढवेल त्याला सामोर जावं लागेल असं मुख्यमत्र्यांनी म्हटलं. हे पण पाहा: BREAKING: राज्यात आणखी वाढणार Lockdown? मुख्यमंत्र्यांबरोबरच्या सर्वपक्षीय बैठकीत काय ठरलं? किमान 15 दिवसांचा लॉकडाऊन करावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, हे जेवढ्या लवकर आपण थोपवू तेवढं आपण आपण हे संक्रमण रोखू शकू. माझं मत आहे की किमान 15 दिवस लॉकडाऊन करावा असं मतं आहे तुम्ही तुमचं मत सांगा. माझं हे म्हणणं नाही की महिना दोन महिना लॉकडाऊन करा, पण आपण हळूहळू एक एक घटक सुरू करू शकतो पण सुरुवात तर करू. लॉकडाऊनची वेळ आली आहे सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी म्हटलं, कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही काही व्यक्तींमध्ये कोविडची लक्षण दिसत आहेत. या संदर्भात मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत बोललो आहे. कोरोनाची साखळी आपल्याला तोडायची आहे. आरोग्य सुविधा वाढवणं गरजेचं आहे. पण आता निर्णय घ्यायची वेळ आली आहे. मध्यंतरीचा काळ बरा होता. सर्व व्यवहार सुरू झाले होते. पण पुन्हा एकदा संसर्ग सुरू झाला आहे. आता तर तरुण वर्ग बाधित आढळतोय. आपण सर्वांना लस देण्याची मागणी करत आहोत. हे पण पाहा: लॉकडाउन लावायचा का? मुख्यमंत्री ठाकरे Vs देवेंद्र फडणवीस LIVE मंत्रालयातून राज्याचा कारभार चालतो तेथेही परिस्थिती गंभीर आहे. गेल्या वेळी आपण रेल्वे बसेस बंद केल्या होत्या. फेब्रवारीपर्यंत इतर राज्यांचं आणि आपलं चित्र सारखं होतं पण विदर्भात चित्र बदलू लागलं. तेथे जो व्हायरसचा स्ट्रेन आढळला त्यामुळे तीव्रता वाढली. या नव्या स्ट्रेनची माहिती आपल्याला आधीच मिळाली असती तर तेव्हाच परीस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न केले असते असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. आपण निर्णय घ्या... आम्ही सहकार्य करू - देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण लॉकडाऊनवर आपलं मत व्यक्त केल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुख्यमंत्री आपण अंतिम निर्णय घ्यावा. आम्ही सहकार्य करु. पुढील 15 दिवस अनेक सुट्ट्या आहेत. त्यामुळेच निर्णय घ्यावाच लागेल. उद्या टास्क फोर्ससोबत निर्णय घेऊ  सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत राज्यात किती दिवस कडक लॉकडाऊन लावायचा याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुख्य सचिव सिताराम कुंटे हे उद्या टास्क फोर्स सोबत बैठक घेऊन निर्णय जाहीर करणार आहेत. आपण आता उद्या आपल्या टास्क फोर्स सोबत निर्णय घेऊयात असं सिताराम कुंटे यांनी म्हटलं आहे. सिताराम कुंटे यांनी बैठकीत म्हटलं, जेवढे अ‍ॅक्टीव्ह रुग्ण आहेत त्यापैकी किती जणांना आँक्सिजन लागणार याच आम्ही मुल्यमापण करतोय. आता आम्ही 100% आँक्सिजन चे नियोजन करण्याची तयारी आम्ही सुरू केलीय. ... तर रुग्णं संख्या 10 लाखांवर जाईल - विजय वडेट्टीवार मदत आणि पुर्नवसनमंत्री विजय वडडेट्टीवार - आपण आता उपाययोजना नाही केली तर रुग्णं संख्या 10 लाखांवर जाईल. ती झाली तर आपण काय करणार... आज निर्णय घेऊन ही चेन तोडणं गरजेचं आहे. वनवाच महाराष्ट्रात लागलेला आहे. आता निर्णय घ्यावाच लागेल. आठवड्याला 40 लाख लस हव्यात - आरोग्यमंत्री बैठकीत आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, रेमडिसिवीर संदर्भात ज्या निर्माण करणाऱ्या 7 कंपन्या आहेत त्यांच्याशी माझी चर्चा झालीय. आपल्यालाल रोज दीड लाखांची गरज आहे. ट्रेसिंग वाढवलं पाहिजे. आम्हाला लसीचा पुरवठा लवकर केला पाहिजे. 40 लाख लस आपल्याला आठवड्याला हव्या आहेत आणि दररोज 6 लाख हव्या आहेत. अशोक चव्हाण म्हणाले, परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी गरिबांचंही नुकसान होणार नाही याचाही विचार करायला पाहीजे. एवढ्या मोठ्या प्रमाणात सर्वांना आर्थिक मदत करता येणार नाही. एक दोन लोकांना ब्रीफिंगसाठी परवानगी मिळावी जेणेकरून योग्य माहिती लोकांपर्यंत पोहोचेल. सर्वपक्षीय बैठकीत महत्वाचे मुद्दे कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही काही व्यक्तींमध्ये कोविडची लक्षण दिसत आहेत. या संदर्भात मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत बोललो आहे - मुख्यमंत्री कोरोनाची साखळी आपल्याला तोडायची आहे - मुख्यमंत्री आरोग्य सुविधा वाढवणं गरजेचं आहे. पण आता निर्णय घ्यायची वेळ आली आहे - मुख्यमंत्री मध्यंतरीचा काळ बरा होता. सर्व व्यवहार सुरू झाले होते. पण पुन्हा एकदा संसर्ग सुरू झाला आहे - मुख्यमंत्री आता तर तरुण वर्ग बाधित आढळतोय. आपण सर्वांना लस देण्याची मागणी करत आहोत - मुख्यमंत्री 'आपल्याला आता एकमुखी निर्णय घ्यावा लागेल' - मुख्यमंत्री 'महिनाभराच्या आत आपण या परीस्थितीवर नियंत्रण मिळवू शकतो, त्यासाठी आपण एकत्र येऊन निर्णय घेतला पाहिजे' - मुख्यमंत्री हे पण पाहा: Maharashtra Lockdown updates: फडणवीसांनी सांगितलं कुठे चुकतंय? सर्वपक्षीय बैठकीत मांडले 'हे' मुद्दे कडक लॉकडाऊन लावण्याच्या राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या या प्रस्तावावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत चर्चा केली. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मदत आणि पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर हे देखील सहभागी होते. या कारणासाठी कडक लॉकडाऊन येत्या 12 ते 18 एप्रिल या काळात दोन सार्वजनिक सुट्ट्या आहेत. यामुळे फक्त गुरुवार आणि शुक्रवार दोनच दिवस अधिकृत कामाचे असणार आहेत. त्याला लागूनच पुढील शनिवार आणि रविवार विकेंडचा लॉकडाऊन सुरू होणार आहे. यामुळे दोन दिवसांसाठी नागरिकांची कामाच्या ठिकाणी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सलग लॉकडाऊन केला तर नागरिकांची गर्दी टाळता येईल आणि लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करता येईल.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Lockdown, Maharashtra, Uddhav thacakrey

पुढील बातम्या