Home /News /mumbai /

BREAKING : उद्धव ठाकरे मंत्रिमंडळाच्या बैठकीला गैरहजर राहण्याची शक्यता

BREAKING : उद्धव ठाकरे मंत्रिमंडळाच्या बैठकीला गैरहजर राहण्याची शक्यता

या बैठकीआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती काँग्रेसच्या नेत्यांनी दिली आहे.

या बैठकीआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती काँग्रेसच्या नेत्यांनी दिली आहे.

या बैठकीआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती काँग्रेसच्या नेत्यांनी दिली आहे.

    मुंबई, 22 जून : शिवसेनेचे नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे (shivsena leader eknath shinde) यांनी पुकारलेले बंड यशस्वी होण्याच्या मार्गावर आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजीनामा देण्याची शक्यता आहे. पण अशातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.  मुख्यमंत्र्यांची अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे मात्र आरटीपीसीआर टेस्ट निगेटिव्ह आली आहे. महाविकास आघाडी सरकार आता शेवटच्या घटका मोजत आहे. अशातच आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackery) यांनी मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. पण या बैठकीआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती काँग्रेसच्या नेत्यांनी दिली आहे. विजय वडट्टेवीर यांनी मुख्यमंत्र्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली पण नंतर त्यांनी शब्द फिरवला. तर नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे या बैठकीला प्रत्यक्षपणे हजर राहणार की नाही अशी शक्यता निर्माण झाली आहे. तर या बैठकीमध्ये विधानसभा बरखास्त करण्याची चर्चा केली जाणार आहे. सरकारने जर बरखास्तीचा प्रस्ताव ठेवला तर निवडणूक लागण्याची शक्यता आहे. पण विधानसभा बरखास्त करायची की नाही याचा संपूर्ण अधिकार हा राज्यपालांना असणार आहे. सरकार जर अल्पमतात आलं तर राज्यपाल हे विरोधी पक्षाला संख्याबळ सिद्ध करण्यासाठी निमंत्रण देेऊ शकते. जर निवडणूक लागली तर सेनेलाही मोठा फटका बसण्याची शक्यता आहे आणि शिंदे गटालाही फटका बसण्याची शक्यता आहे. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. हीच बैठक आज अखेरची बैठक असल्याची शक्यता आहे. या बैठकीमध्ये सर्व मंत्र्यांना उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार अशी माहिती देणार आहे. त्यानंतर ते आपला राजीनामा देणार आहे, असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधातच मोठे बंड पुकारले आहे. सर्व आमदारांना घेऊन शिंदे हे आता गुवाहाटीमध्ये मुक्कामी आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे ३३ आमदारांची फौज आहे. एकनाथ शिंदे हे आज राज्यपालांना भेटून प्रस्ताव देण्याची शक्यता आहे. त्यातच आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी हात आता खाली टेकले आहे. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधान सभा बरखास्तीचया दिशेने, असं म्हणत संजय राऊत यांनी ठाकरे सरकारच्या अस्ताचे संकेत दिले आहे. तर दुसरीकडे शिवसेनेच्या गटनेतेपदावरून हटवल्यानंतर बंडखोर आमदारांबरोबर असलेले एकनाथ शिंदे अधिक आक्रमक झाले आणि याच सगळ्या वादळाच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंनी त्यांच्या प्रोफाइवरून मंत्रिपदाचा उल्लेख काढला आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या